पोलिसांनी टाळ्या वाजवून त्यांचे केले स्वागत 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

पोलिसांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी पुन्हा अधीक्षक पदाची सुत्रे स्वीकारली. यावेळी मुख्यालयात पोलिस बॅंडनेही सलामी दिली. 

सांगली ः पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी कोरोनावर मात केली असून पोलिस मुख्यालयात त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. अप्पर पोलिस अधीक्षक मनिषा दुबुले यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. पोलिसांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी पुन्हा अधीक्षक पदाची सुत्रे स्वीकारली. यावेळी मुख्यालयात पोलिस बॅंडनेही सलामी दिली. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस चोवीस तास रस्त्यावर उभे आहेत. लॉकडाउनच्या काळात जिल्ह्यातील सीमा भागात खडा पाहरा पोलिसांचा होता. याशिवाय नाकाबंदीसह रुग्णालयातील बंदोबस्तात पोलिसांचा प्रत्यक्ष सहभाग होता. अधीक्षक शर्मा यांच्या नेतृत्वाखाली नियंत्रण करण्यात आले. पोलिस दलातील पन्नास वर्षावरील कर्मचाऱ्यांना कार्यालयीन काम देण्यात आले होते. तसेच प्रत्येक पोलिस ठाण्यात सॅनिटाझर, मास्कसह इतर सुरक्षिततेची साधनेही देण्यात आली. पोलिस दलात कोरोनाचा आल्यानंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांची दर 48 तसांनी पोलिसांची तपासणी करण्यात येत होती. पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर उत्तम उपचार आणि सुविधा देण्यासाठीही अधीक्षक शर्मा यांनी पुढाकार घेतला. 

अधीक्षक शर्मा यांनी काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. याकाळात अप्पर अधीक्षक मनिषा दुबुले यांनी कार्यभार संभाळला. श्री. शर्मा कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांनी आज मुख्यालयात पुन्हा सुत्रे स्वीकारली. यावेळी त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. पुष्पवृष्टी करून "कोरोना योद्धा'चा सन्मान करण्यात आला. यावेळी पोलिस बॅंडनेही सलामी दिली. 
... 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The police greeted him with applause