
सांगली : इनाम धामणी (ता. मिरज) येथील बत्तीस माग कारखान्याजवळ चालणाऱ्या तीनपानी जुगार अड्ड्यावर एलसीबीच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेतले असून दिग्विजय सुभाष श्रीरंबेकर (रा. मौजेडिग्रज), महेश जिन्नू बिरणे, अक्षय राजेंद्र भोसले, अच्युत गोपाळ नाईक, सुहास कृष्णा कोळी व सतीश महावीर पाटील (सर्व रा. इनामधामणी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून सहा मोबाईल, ३ मोटारसायकली, रिक्षासह इतर साहित्य असा २ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.