मोकांतर्गत १५० गुन्हेगारांवर कारवाई

police take action against  criminals under Mokaka
police take action against criminals under Mokaka
Updated on

कऱ्हाडः जिल्ह्यात २०१९-२० मध्ये १४ ‘मोका’ प्रस्तावात १५० हून अधिक गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. त्यात कऱ्हाड तालुक्यातील ४० जणांवर मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. सध्या जिल्ह्यातील मोक्का कारवाईचा कोणताही प्रस्ताव नसल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

येथीव शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, शहराचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, वाहतूक साहायक पोलिस निरीक्षक सतीश पवार आदी उपस्थित होते. 

श्री. वारके म्हणाले, “ जिल्ह्त गुन्हेगारीवर पोलिसांचे लक्ष असून युवकांमध्ये प्रबोधन करणे गरजेचे आहे. पोलिस प्रशासनाकडून त्याला प्राधान्य दिले जात आहे. शहरात वाहतुकीची सर्वात मोठी समस्या असून, त्यावर काम करावे लागणार आहे. शहरातील मुख्य ठिकाण असणाऱ्या कोल्हापूर नाका येथील उड्डाण पुलावरुन दुहेरी वाहतूक करण्यासाठीचा निर्णय पुढील बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे. शहरातील शाहू चौक व दत्त चौकातील वाहतुकीवर पोलिसांकडून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या असून, त्यासाठी वाहतुकीच्या ठिकाणी बॅरिकेट लावावेत”

पोलिस अधीक्षक सातपुते म्हणाल्या, “शहरातील वाहतुकीचा प्रश्न गांभीर्याने पाहणाऱ असून, पालिका व पोलिसांची लवकरच संयुक्त बैठक घेतली जाईल. शहरातील वाहतूक समस्या सोजवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास प्रधान्य राहील. अतिक्रमणांवरही समन्वय साधून निर्णय घेतला जाईल. पाटणा तालुक्यातील करपेवाडी येथील गेल्या वर्षी जानेवारीत झालेल्या मुलीच्या खुनाचा तपास योग्य दिशेने सुरू असून, आरोपीची नार्को चाचणी केली जाणार आहे. लवकरच त्या गुन्ह्याचा छडा लावला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Social Reforms: MAnis Announces State-Level Awards for Dedicated Rationalist Activists
six people killed in Maharashtra Karnataka border land dispute vijapur chadchan crime
Crime
Ek Bharat Shreshtha Bharat Program News
Marathi News Esakal
www.esakal.com