esakal | पोलिस गेले कर्जतच्या आरोपींच्या शोधात, सापडले हे घबाड
sakal

बोलून बातमी शोधा

Police went to Karjat to search for the accused, and found that they were afraid

चोरांनी दडवलेला खजिना पोलिसांनी हस्तगत केला आहे. या चोरांची साखळी ही मोठी असल्याची माहिती आहे. दरम्यान, कर्जत प्रकरणातही श्रीगोंदे तालुक्यातील कोळगाव येथील काही आरोपी सामील असल्याची पोलिसांकडे माहिती आहे.

पोलिस गेले कर्जतच्या आरोपींच्या शोधात, सापडले हे घबाड

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे : कर्जत येथील  कारागृहातून पलायन केलेल्या आरोपींच्या शोधात असलेल्या श्रीगोंदे पोलिसांच्या हाती वेगळंच घबाड लागलं आहे. या घबाडामुळे शेतकर्यांचा फायदा होणार आहे. 

कर्जत प्रकरणात श्रीगोंद्याचाही हात

चोरांनी दडवलेला खजिना पोलिसांनी हस्तगत केला आहे. या चोरांची साखळी ही मोठी असल्याची माहिती आहे. दरम्यान, कर्जत प्रकरणातही श्रीगोंदे तालुक्यातील कोळगाव येथील काही आरोपी सामील असल्याची पोलिसांकडे माहिती आहे.

संध्याकाळपर्यंत सापडतील
कर्जतच्या कारागृहातून पलायन केलेल्या पाच आरोपींच्या शोधात जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा राबत आहे. यातील तीन जण हाती लागले आहेत. इतर दोघांच्या तपासात प्रगती असल्याची माहिती आहे. संध्याकाळपर्यंत तेही हाती लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वेगळाच खजिना मिळाला

दरम्यान याच आरोपींच्या शोधात असणाऱ्या श्रीगोंदे पोलिसांना  वेगळेच आरोपी सापडले. त्यांच्याकडून चोरी केलेले ट्रॅक्टर सापडले आहेत. श्रीगोंदयाचे पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांनी कर्जतच्या आरोपींचा शोध घेण्यासाठी मोठी नाकाबंदी केली होती. त्यातच  पोलीस अधिकारी राजेंद्र सानप यांचे पथक कोळगाव येथील एका जणाने कारागृहातील आरोपींना पळून जाण्याचा मदत केल्याची माहिती हाती लागली.

मी त्यात नव्हतो

त्यातीलच एका संशयिताला  उचलण्यासाठी गेले होते.  कोळगाव येथील हा आरोपी कर्जतमधून पळालेल्या कायद्यांना सामील असल्याची माहिती पोलिसांकडे होती. मात्र, तो हाती लागल्यानंतर दुसऱ्या आरोपीने त्यांना मदत केल्याचे समजले. त्या आरोपीपर्यंत जाण्याअगोदरच त्याचा मित्र हाती लागला. आणि त्याने तो  कर्जतमध्ये नव्हतो, मात्र, ट्रॅक्टर चोरीत आहे, असा सहज सांगून  गेला. यातूनच श्रीगोंद्यात चोरीला गेलेले ट्रॅक्टरचे गुन्हा उघडकीस येतोय.

सातजणांचे निष्पन्न

ट्रॅक्टर चोरीप्रकरणी सहा ते सात जण आरोपी निष्पन्न झाले आहेत. यातील काही जण पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. दोन  ट्रॅक्टर हाती लागले असून ही ट्रॅक्टर चोरी साखळी ही मोठी असल्याची माहिती आहे.

याबाबत पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. याबाबत आरोपी अटक झाल्यानंतर सगळी माहिती देऊ असे सांगितले.
 

loading image
go to top