कोल्हापूर : फौजदारासह तीन पोलिसांना जन्मठेप

कोल्हापूर : फौजदारासह तीन पोलिसांना जन्मठेप
Updated on

पेठवडगावातील सनी पोवार खून खटला 

कोल्हापूर : पेठवडगाव येथील बहुचर्चीत सनी पोवार खून खटल्यात आज सहाय्यक पोलिस निरीक्षकासह तिघां पोलिसांना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मपेठ आणि प्रत्येकी 15 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सहायक पोलिस निरीक्षक संजय रामचंद्र पाटील, सहायक फौजदार बबन दादू शिंदे आणि पोलिस नाईक धनाजी पाटील अशी त्यांची नावे आहेत. सत्र न्यायाधीश एल.डी. बिले यांनी ही शिक्षा सुनावली. 

पोलिस ठाण्यात पोलिसांनी केलेल्या मारहाणीत पेठवडगाव येथील कार्यकर्ता जगदीश उर्फ सनी प्रकाश पोवारचा मृत्यू झाल्यामुळे या खटल्याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. 23 ऑगस्ट 2014 रोजी पोवारच्या मृत्यूनंतर पेठवडगावसह जिल्ह्यांत अशांतता पसरली होती. पोलिसांवरच भारतीय दंडविधान कलम 302 प्रमाणे खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे पोलिसांसह सर्वसमान्यांचे या निकालाकडे लक्ष लागून होते. या निकालानंतर जिल्ह्यातील पोलिसांत एकच चर्चेचा विषय ठरला. विशेष सरकारी वकील म्हणून अशोक रणदिवे यांनी काम पाहिले. 

हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथे 23 ऑगस्ट 2014 रोजी कार्यकर्ता सनी पोवार याने बसवर दगडफेक केली म्हणून पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्यावर सरकारी कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल केला. त्याला आंबेडकर चौकातून माराहण करीत पोलिस ठाण्यात नेले. तेथे गुन्हा दाखल झाल्यावर पोलिस ठाण्याचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक संजय रामचंद्र पाटील याच्यासह इतरांनी त्याला टीव्ही रुममध्ये नेले. तेथे त्याला मारहाण केली. तेथे त्याच्या पोटात दुखू लागल्यामुळे पोलिसांनी तातडीने 'सीपीआर'मध्ये दाखल केले. तेथे त्याला मयत घोषित केले. 

यानंतर सनीचा भाऊ जयदीप प्रकाश पोवार याने वडगाव पोलिस ठाण्यात संजय पाटील, बबन शिंदे आणि धनाजी पाटील यांच्या विरोधात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार त्यांच्या 302 खुनाचा गुन्हा दाखल झाला. यामुळे मृतदेह पुढील तपासणीसाठी मिरज मेडिकल कॉलेजला पाठविण्यात आले. यानंतर पुरावा दाखल करून त्यांच्यावर दोषारोप पत्र दाखल केले. तत्कालीन सत्र न्यायाधीश एम.बी. तिडके व त्यानंतर एल.डी. बिले यांच्यासमोर सुनावणी सुरू झाली. 

सरकारी वकील म्हणून अशोक रणदिवे यांनी काम पाहिले. या प्रकरणात 26 साक्षीदार तपासण्यात आले. यापैकी काही साक्षीदार फितूर झाले. तथापि जयदीप प्रकाश पोवार, एल.जी. सनदी, किशोर पोवार, राजू पोवार, राजू आयरेकर, डॉ. राजेश वर्दाळे, कॉन्स्टेबल मिलिंद झेंडे, नायब तहसीलदार अनंत गुरव, सहायक फौजदार विलास यादव, उपनिरीक्षक गणेश वारुळे, पोलिस निरीक्षक रेश्‍मा कुंभार, उपअधीक्षक तपासी अधिकारी मा.शा. पाटील यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर सत्र न्यायाधीश एल.डी. बिले यांनी तीनही आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी 15000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच, दंडाची प्रत्येकी पंधरा हजाराची सुमारे 45 हजारांची रक्कम मयत सनी पोवारचा भाऊ जयदीप पोवार यांना देण्याचे आदेश दिले. 
खटल्याची सुनावणी ऑक्‍टोबर 2015 पासून सुरू झाली होती. आरोपीतर्फे हर्षद निंबाळकर, एम.डी. सुर्वे, शिवाजीराव राणे आदी वकिलांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Hotelier Couple From Palus Dies After Poisoning Incident Reason Behind the Suspected Suicide Remains Unknown
Zolambi Tourism Demand Grows In Sangli Nature Lovers Seek Opening During Flowering Season And Government Approval
Railway Mega Block In Pune Division Affects Miraj Kolhapur Trains Route Changes And Partial Journey Curtailment Announced
Eight Students Cause Trouble On ST Bus Driver Conductor Stay Alert Emergency Door Incident Ends At Police Station
Marathi News Esakal
www.esakal.com