अँन्टीकरप्शनच्या जाळ्यात पोलिस

सुर्यकांत बनकर
शनिवार, 2 जून 2018

करकंब :  करकंब पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार शिवाजी रुद्रा वनखंडे (वय ४८, रा.इसबावी, पंढरपूर) यास २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक कविता मुसळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी रात्री दहा वाजणेचे सुमारास उजनी वसाहत (करकंब) येथे करण्यात आली. 

करकंब :  करकंब पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार शिवाजी रुद्रा वनखंडे (वय ४८, रा.इसबावी, पंढरपूर) यास २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक कविता मुसळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी रात्री दहा वाजणेचे सुमारास उजनी वसाहत (करकंब) येथे करण्यात आली. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे मेहुणे व इतरांविरुद्ध करकंब पोलिस ठाण्यात सावकारकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामिन मिळवून देण्यासाठी व तपासात सहकार्य करण्यासाठी शिवाजी वनखंडे यांने एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यातील पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक कविता मुसळे, उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण देवकर, पोलिस निरीक्षक वैभव मारकड व त्यांच्या सहकाऱ्यांनी उजनी वसाहत, करकंब येथे शुक्रवारी रात्री दहा वाजणेचे सुमारास आरोपीस रंगेहात पकडण्यात आले. त्यांनतर आज (शुक्रवार) पहाटे तीन वाजणेचे सुमारास करकंब पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे. 

  • करकंब पोलिसांवरील तिसरी कारवाई 

यापूर्वीही करकंब पोलिस ठाण्यातील एका सहायक पोलिस निरीक्षकासह एका पोलिस कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून कारवाई केली होती. त्यांनतर शुक्रवारी तिसरी कारवाई करण्यात आली. याशिवाय सोलापूर ग्रामीण पथकाने एका जुगार अड्ड्यावर अचानक धाड टाकून येथील पोलिस कर्मचाऱ्यालाच जुगार खेळताना रंगेहाथ पकडले होते. त्यामुळे दोन नंबर धंद्यांवर व गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या करकंब पोलिस ठाण्यातील कर्मचारीच वारंवार वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आरोपी ठरु लागले आहेत. त्यामुळे येथील कायदा अन सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. याशिवाय करकंब पोलिस ठाण्यांतर्गत अनेक गावात दोन नंबरचे धंदे राजरोसपणे चालू आहेत. यात अनेकवेळा पोलिस अधिक्षक वीरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने कारवाया केल्या आहेत. मग करकंब पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून या कारवाया का केल्या जात नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे अवैध व्यवसाय तेजीत चालत असताना येथील पोलिस कर्मचारीच गुन्हेगार ठरत असल्याने सामान्य जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Policeman cought in the anticorpation net