विनाशुल्क सेवेत आता वैद्यकीय उपचारासाठी मिळणार घरबसल्या मार्गदर्शन

the policy of e sanjeevani for people provide free medical service in belgaum
the policy of e sanjeevani for people provide free medical service in belgaum

बेळगाव : घरबसल्या वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यासाठी ‘ई-संजीवनी’ योजना जारी करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून टेली मेडिसीन अर्थात ऑनलाईन पद्धतीने वैद्यकीय उपचारासाठी मार्गदर्शन केले जात आहे. औषधासह वैद्यकीय सल्ला दिला जात असून ही सेवा विनाशुल्क आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर खासगी डॉक्‍टरांकडून वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यासाठी अनास्था दाखविण्यात आली. सरकारी रुग्णालयात केवळ कोरोनावर उपचाराला प्राधान्य देण्यात आल्यामुळे कोविडत्तर रुग्णांसाठी वैद्यकीय उपचार मिळताना अडचणी जाणविल्या. ताप, सर्दी, खोकल्यासह किरकोळ आजारांवर वैद्यकीय उपचार मिळत नव्हते. त्यामुळे ई-संजीवनी या नावाने ऑनलाईन वैद्यकीय उपचार उपलब्ध देण्यात आले.

ई-संजीवनी ॲप डाउनलोड करुन त्या आधारे संबंधीत रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी संपर्क साधल्यास ऑनलाईन वैद्यकीय उपचाराची माहिती दिली जाते. ‘ॲप’च्या माध्यमातून व्हिडिओ कॉलिंग करुन रुग्णांच्या आरोग्य आणि वास्तवस्थितीची माहिती घेतली जाते. त्यानंतर टेली मेडिसीनच्या माध्यमातून वैद्यकीय उपचारासाठी औषध लिहून पाठविले जाते. त्यामुळे घरबसल्या वैद्यकीय सल्ला किंवा औषध मिळविता येत आहे. त्वरित वैद्यकीय उपचारामुळे रुग्णांची ओढाताण कमी होत असल्याचेही दिसून येत आहे.

अपघातातील गंभीर जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळणे आवश्‍यक आहे. यासंदर्भात जखमींना वेळेत उपचार मिळवून देण्यासह पुढील कार्यवाहीसाठी तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून ई-संजीवनीद्वारे सल्ला मिळणार आहे. शिवाय परिसरातील खासगी आणि सरकारी रुग्णालयांचीही माहिती फोनच्या माध्यमातून मिळविता येणार आहे. ई-संजीवनी ॲपद्वारे रुग्णांना वैद्यकीय सल्यासह ऑनलाईन प्रिस्क्रीप्शन पाठविले जाते. ते दाखविण्यात मेडिकलमधून औषध मिळत असल्यामुळे या योजनेचा प्रचार करण्याचे प्रयत्न आरोग्य विभागाकडून सुरु आहेत.

"घरबसल्या वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी ई-संजीवनी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात ही योजना सुरू होऊन दोन महिने झाले आहेत. ई-संजीवनी ॲपच्या माध्यमातून संपर्क साधून तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून वैद्यकीय सल्ला घेता येईल."


- डॉ. चांदणी, जिल्हा कुष्ठरोग नियंत्रण अधिकारी 

संपादन - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com