esakal | बेळगावात विद्यागम योजना पुन्हा लागु होणार ?
sakal

बोलून बातमी शोधा

the policy of vidyagama in balgam start again for the students in belgaum

कोरोनाच्या संकटामुळे शाळा सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे शिक्षण खात्याने ऑगस्ट महिन्यापासून विद्यागम योजना लागू केली होती.

बेळगावात विद्यागम योजना पुन्हा लागु होणार ?

sakal_logo
By
मिलिंद देसाई

बेळगाव : कोरोनाचे संकट कायम असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने पुन्हा एकदा विद्यागम योजना लागू करण्याचा विचार सुरू केला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योजनेत काही प्रमाणात बदल करण्यात येणार आहेत. 

कोरोनाच्या संकटामुळे शाळा सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे शिक्षण खात्याने ऑगस्ट महिन्यापासून विद्यागम योजना लागू केली होती. शिक्षकांना विविध गावात जाऊन विद्यार्थ्यांना शिकवावे लागत होते. त्यामुळे अनेक दिवस शिक्षणा पासून दूर असलेले विद्यार्थी शिक्षणाकडे वळले असल्याने पालकांमधून समाधान होत आहे. परंतु रामदुर्ग तालुका इतर भागात विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच शिक्षकांनाही दसरा सुट्टी देण्यात आली होती. मात्र योजना बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. 

हेही वाचा - बेळगावात होणार 907 अतिथी शिक्षकांची नेमणूक -

त्यामुळे पुन्हा एकदा योजना लागू करण्याची मागणी होती. याची दखल घेत शिक्षण खात्याने पुन्हा एकदा योजना सुरू करण्याचा विचार सुरू केला आहे. डिसेंबर महिन्यापासून शाळा सुरू करण्याबाबत सरकारतर्फे चर्चा सुरू आहे. मात्र कोरोनाचे संकट काही भागात वाढत असल्याने शाळा सुरू करण्यास पुन्हा विलंब होणार असेल तर पुन्हा योजना सुरू केली जाणार आहे. तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी योजनेत अनेक बदल केले जाणार असून योजना कधीपासून लागू करायची याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. अशी माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली आहे.

"शाळा लवकर सुरू करण्याचा निर्णय झाला नाही तर विद्यागम योजना लागू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकडे लक्ष दिले जात आहे."

- ए. बी. पुंडलिक, जिल्हा शिक्षणाधिकारी

संपादन - स्नेहल कदम 

loading image