मंगळवेढा : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन

हुकूम मुलाणी 
रविवार, 15 सप्टेंबर 2019

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात संभाव्य इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीपूर्वी मोठे शक्तिप्रदर्शन केले आहे.

मंगळवेढा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात संभाव्य इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीपूर्वी मोठे शक्तिप्रदर्शन केले. यामध्ये कोणत्या पक्षातून उमेदवारी हे ही निश्चित केले नाही पण नेत्यांच्या या राजकीय शक्ती प्रदर्शनात सर्वसामान्यांचे रखडलेले प्रश्न मात्र हरवले गेले.

तालुक्यातील जनतेला सध्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, अशा परिस्थितीमध्ये या समस्याची सोडवून या सरकारकडून आचारसंहितेपूर्वी व्हावी ही अपेक्षा आहे. परंतु त्यात अजूनही यश आले नसल्यामुळे त्यामुळे सर्वसामान्यात नाराजीचा सूर आहे. अशा परिस्थितीत सुरुवातीला शहा बँकेचे अध्यक्ष राहूल शहांना आपल्या गटात घेत आमदार परिचारकांनी शक्ती प्रदर्शन केले. त्यामध्ये आमचं ठरलंय ही भूमिका मांडताना पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या कामाचा अहवाल लोकांसमोर मांडला.

केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनेची माहिती उपस्थितांना दिली. अलिकडच्या काळात परिचारकांना काही कामाला निधी मिळवला, पण मुळ प्रश्नाकडे ताकद लावली नाही. त्यानंतर आमदार भारत भालके यांनीही मतदारसंघातील जनतेला एकत्र बोलावून मोठे शक्तिप्रदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी जनता हाच माझा पक्ष असून, मी जो निर्णय घेईल त्यास आपले समर्थन आहे का, असे विचारत जनतेकडून हात वर करून घेत त्यांचे मत अजमावून घेतले.

याशिवाय तालुक्यातील रखडलेल्या पाणीप्रश्न, महात्मा बसवेश्वर स्मारक, याशिवाय इतर प्रश्नाबाबत विधानसभेत आवाज उठविल्याचे सांगितले. परंतु रखडलेल्या प्रश्नाकडे विरोधी आमदार असल्याने सरकारने दुर्लक्ष केले असे या सभेत पक्ष बदलांच्या हालचालीमुळे सांगितले नाही.

त्यानंतर दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनीही कारखान्यावर असावनी प्रकल्पाच्या निमित्ताने गर्दी जमविली. त्यांनी यंदा भाकरी ठेवण्याचे आवाहन करीत गेल्या दहा वर्षापासून रखडेल्या पाणी प्रश्नाबाबत आमदार भालके  यांच्यावर निशाणा साधला. बहुचर्चित 35 गावाच्या पाणी प्रश्न व इतर प्रश्नासंदर्भात त्यांनीही सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेना व भाजपच्या माध्यमातून प्रयत्न करण्यास करायवयास हवे होते परंतु त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही काटकसरीचा कारभार व कारखाना निवडणुकीतील वचनपूर्तीकडे अधिक लक्ष दिले निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यास अजून काही दिवसांचा अवधी असला तरी या नेत्यांनी शक्तीप्रदर्शन करण्यात मात्र आघाडी घेतली आहे परंतु शहर व ग्रामीण भागातील जनतेला एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्या रखडेल्या प्रश्नाला दुर्लक्ष केलेल्या  सत्ताधारी पक्षाच्या विरोधात या शक्तीप्रदर्शनात कोणीही आवाज उठवला नाही 

हे आहे तालुक्यातील रखडलेले प्रश्न बहुचर्चित 35 गावांचा पाणी प्रश्न, महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकात वारंवार निघणाऱ्या त्रुटी,रब्बी दुष्काळ निधीतून तालुक्यावर अन्याय,खरीप व रब्बी पिक विम्यात गोलमाल, तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयातील रिक्त पदे, विस्कळीत आरोग्यसेवा, ग्रामीण भागातील खराब रस्ते, मजुरांच्या हाताला कोणतेही काम नसल्यामुळे इतर तालुक्यात होणारे स्थलांतर, शासकीय कार्यालयात ग्रामीण जनतेला होणारी त्रासदायक वागणूक. यावर दै. सकाळ ने आवाज उठवला तर  आ. भालके यांनी विधानसभेत आवाज उठवला याप्रश्नाकडे विरोधी आमदार म्हणून सत्ताधाय्रानी दुर्लक्ष केले या रखडलेल्या प्रश्नाबाबत प्रशांत परिचारक व समाधान आवताडे यांनी आपल्या ताकदीचा उपयोग करून या भागाला न्याय देणे आवश्यक होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The political arena of magalvedha city in solapur