नेते कार्यकर्त्यांतील दुरावलेला संपर्क वाढण्यास सुरवात

The political tide is now flowing
The political tide is now flowing

लेंगरे : विधानसभा मतदारसंघात कोरोनामुळे निर्माण झालेली राजकीय सामसूम आता पुन्हा गजबजू लागली आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजल्यामुळे कोरोनामुळे नेते कार्यकर्त्यांतील दुरावलेला संपर्क वाढण्यास सुरवात झाली आहे. मतदारसंघात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर माजी आमदार सदाशिवराव पाटील, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची राजकीय वर्चस्वाची चढाओढ आहे. 

श्री. पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मतदारसंघात राष्ट्रवादी बळकट करण्यासाठी मंत्री जयंत पाटील यांनी माजी आमदार पाटील यांना पाठबळ दिले आहे. शरद पवारांनी पाटील घराण्याचे पूर्वीचे स्नेहबंधन अबाधित ठेवण्याचे संकेत दिले आहेत. ते पुन्हा मतदार संघात आपला राजकीय ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत; तर ग्रामपंचायत निवडणुकांसाठी गावातील गावपुढाऱ्यांनी नेत्यांना साकडे घालण्यास सुरवात केली आहे. उत्साही कार्यकर्तेही गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. त्यांचा नेत्यांच्या डोक्‍याला ताप होत आहे. 

तरुणांचे नेता म्हणून गोपीचंद पडळकरांची ओळख आहे. विधान परिषद सदस्य, पक्षप्रतोद अशा जबाबदाऱ्या भाजपने पडळकरांना दिल्या. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. मतदारसंघातील धनगर समाजाची ताकद पडळकर यांच्या बरोबर आहे. राजकारणातील मुरब्बी शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल बाबर यांची मतदारसंघात पकड मजबूत आहे. माजी आमदार पाटील, आमदार पडळकर यांच्या राजकीय हालचालींवर बाबर यांचे बारकाईने लक्ष आहे. 

कोरोनामुळे मतदारसंघातील राजकीय हालचाली थंड झाल्या होत्या. मात्र आता ग्रामपंचायत निवडणुकीमुळे गावोगावचे कार्यक्रम बंद असलेले कार्यक्रम पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली आहे. नेत्यांची थांबलेली धावपळ पुन्हा सुरू झाली आहे. अपवादानेच नेत्यांच्या संपर्कात असणारे कार्यकर्तेही पुन्हा कव्हरेज क्षेत्रात आले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकाच्या दररोज गाव कट्टयावर राजकारण्याच्या रंगणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गप्पाना पुन्हा सुरवात झाली आहे. 

यावर्षी लग्नसमारंभातील नेत्यांची धावपळ दिसून आली नाही. परिसरात कोरोनाचा वाढलेला प्रभाव कमी झाल्याने नेत्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांनी खबरदारी घेत भेटी घेणे पसंत केले आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यालयात दिवसभर असणारी कार्यकर्त्यांची थांबलेली वर्दळ वाढीस लागली आहे. अपवादाने एकमेकांसमोर येणाऱ्यांचा लांबूनच होणार नमस्कार जवळून घालण्यास सुरवात केली आहे. मतदारसंघातील थंडावलेले राजकीय वारे ऐन थंडीत ग्रामपंचायती निवडणुकीमुळे गरम होऊ लागले आहे. दररोज कोरोनाचीच चर्चा सुरू असलेल्या भागात या चर्चेचे रुपांतर ग्रामपंचायत निवडणुका कशा होतील यामध्ये झाले आहे.

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com