
शिराळा : खेड (ता. शिराळा) येथील कुंभारकी तलावात चार दिवसांपूर्वी शिराळा औद्योगिक वसाहत परिसरातील सोडलेल्या दूषित सांडपाण्यामुळे अनेक मासे मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची दाखल घेऊन संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.