आटपाडीत सौद्ये बाजारात डाळिंबाला इतिहासातील उच्चांकी दर

नागेश गायकवाड
Saturday, 9 January 2021

आटपाडी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब सौदे बाजारात शेटफळेचे शेतकरी रुपेश बाळू गायकवाड यांच्या ग्रेड वन 96 किलो डाळिंबाला विक्रमी 1151 रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. आटपाडी डाळिंब सौदे बाजाराच्या इतिहासातील हा उच्चांकी भाव ठरला. 

आटपाडी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब सौदे बाजारात शेटफळेचे शेतकरी रुपेश बाळू गायकवाड यांच्या ग्रेड वन 96 किलो डाळिंबाला विक्रमी 1151 रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. आटपाडी डाळिंब सौदे बाजाराच्या इतिहासातील हा उच्चांकी भाव ठरला. 

शेटफळेचे शेतकरी रुपेश गायकवाड यांची डाळिंबाची तीन हजार झाडे आहेत. दरवर्षी त्यांच्या डाळिंबाला चांगला भाव मिळतो. 20 जुलै रोजी धरलेल्या बागेचा माल विक्रीसाठी आला आहे. अतिवृष्टी, सततचा पाऊस या साऱ्याला तोंड देऊन त्यांनी बाग केली आहे. यातील अवघे 119 किलो उच्च दर्जाचे, आकर्षक रंग आणि सातशे ते आठशे ग्रॅम वजनाचे डाळिंब लिलावासाठी आटपाडी बाजार समितीमध्ये आणले होते.

 गणेश फ्रूट मार्केटिंग सेंटरवर त्यांनी लिलावासाठी डाळिंब ठेवले होते. ग्रेड वनचे चार रेट 96 किलो वजनाचे होते. याला उच्चांकी 1151 रुपये प्रतिकिलो भाव बोलीत मिळाला. 96 किलो डाळिंबाचे तब्बल एक लाख दहा हजार 496 रुपये मिळाले. ग्रेड 2 चे 1 ते 20 किलो वजनाचे होते. त्याला प्रतिकिलो सहाशे रुपये भाव मिळाला. या 23 किलो वजनाचे 13 हजार 800 रुपये मिळाले. एकूण 119 किलो डाळिंबापासून 1 लाख 24 हजार 224 रुपये शर्टिंग हमाली वजा करून त्यांच्या हातात मिळाले. 

119 किलो चांगल्या उच्च प्रतीच्या डाळिंबापासून डाळिंब सौदे बाजारात विक्रमी 1 लाख 24 हजार रुपये मिळाले. उच्च दर्जाचे डाळिंब होते. आत्तापर्यंत उच्चांकी हा मिळालेला भाव होता. 
- रुपेश गायकवाड, शेतकरी

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pomegranate has a record high in the market