

Fresh pomegranates displayed at Pune’s Gultekdi market after prices touched record highs.
sakal
आटपाडी : यंदा डाळिंब बागांना निसर्गाच्या लहरीपणासह अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. परिणामी, डाळिंबाची आवक घटली आहे. पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्याने डाळिंब दराच्या ‘गोडी’त विक्रमी वाढ झाली आहे. डाळिंबाच्या दराने इतिहासातील उच्चांक गाठला असून शेतकऱ्यांसाठी ही दरवाढ दिलासादायक ठरत आहे.