
आटपाडी : दुचाकीवरून घरी निघालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे दोघा अनोळखी तरुणांनी पोलिस असल्याची बतावणी करून साडेचार तोळे सोने लुटण्याची धक्कादायक घटना आटपाडीत शनिवारी (ता. ३१) बाजारादिवशी घडली. नारायण तातोबा चव्हाण (यमाजी पाटलाचीवाडी) यांनी या फसवणुकीची तक्रार आटपाडी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.