‘झुंड’मुळे सोलापूर जिल्ह्यात ‘सैराट’ पुन्हा चर्चेत

A poster of Nagaraj Manjules film is on display
A poster of Nagaraj Manjules film is on display

सोलापूर : नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित होताच ‘सैराट’च्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला झुंड चित्रपटात नेमके काय असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. नागराज मंजुळे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत नावलैकीक मिळवल्यानंतर पहिल्यांदाच हिंदी चित्रपटात यानिमित्ताने ते पदार्णण करत आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात नागराज यांच्या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता लागली आहे. सोशल मीडियावर सुद्धा याचे पोस्टर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आसून त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.
‘फॅड्री’ चित्रपटाने ओळख निर्माण केलेल्या नागराज मुंजळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटाने मराठी चित्रपत्रसृष्टीला वेगळ स्थान निर्माण करुन दिले. आज सैराट प्रेक्षकांच्या मनात आहे. त्याचे चित्रण झालेल्या करमाळा तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटक येतात. आर्ची आणि परशा बसलेले झाड, विहीर, उजनी काटचा परिसर पाहण्यासाठी पर्यटक येत आहेत. कंदर येथील पाटलाचा वाडा हे ‘सैराट’मुळे पर्यटनस्थळ झाले आहे. या चित्रपटात असलेले बिटरगाव सध्या नागराज मुंजुळे यांच्या सैराट चित्रपटाचे गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. त्यावरुन झुंड चित्रपट देखील वेगळा असणार असा अंदाज लावले जाऊ लागले आहेत.
पोस्टरवर एक झोपडपट्टीचा परिसर दाखवण्यात आला आहे. त्यावर एका व्यक्तीचा पाठीमागून फोटो आहे. त्यावर झुंड असा मंजकुर आहे. त्याच्यापुढे फुटबॉल दाखवण्यात आला आहे. त्यावरून फुटबॉलवरीती आधारीत हा चित्रपट असलेल असा अंदाज येत आहे. त्याचे पोस्टर आज प्रकाशीत झाले आहे. २०१८ ते २०१९ दरम्यान याचे चित्रण झाले आहे.  यामध्येही अमिताभ बच्चन यांच्याशीवाय नवीन कलाकावर कोण असणार का जुनेच कलाकार असणार याची उत्सुकता लागली आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित होताच प्रतिक्रयाचा पाऊस पडू लागला आहे. यामध्ये शुभेच्छा देण्यात आल्या आसून ‘हे समीकरण हिंदी चित्रपट क्षेत्रात धुमाकुळ घातल्याशीवाय राहणार नाही’, असं महेश क्षिरसागर यांनी म्हटले आहे.

नागराज यांची पोस्ट
नागराज मंजुळे यांनी त्यांच्या फेसबुकवरती झुंडचे पोस्टर पोस्ट केले आहे. त्यावर त्यांनी म्हटले की, झुंड!!!
मी स्वत:च या क्षणाची वाट पहात होतो...
अखेर टीझर उद्या येतोय...
चांगभंल!!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com