Video : पोस्टमनला येतोय ब्रॅंण्डऍम्बेसिडरचा लुक

Video : पोस्टमनला येतोय ब्रॅंण्डऍम्बेसिडरचा लुक

कोल्हापूर - माहिती तंत्रज्ञानामुळे टपालाव्दारे पाठविल्या जाणाऱ्या पत्रांची संख्या काहीशी कमी जरूर झाली आहे तरीही कार्यालयीन कामकाजातील कागदपत्रे टपालाव्दारे पाठवण्याचे महत्व आजही कायम आहे अशी पत्रे घेऊन घरोघरी जाणाऱ्या पोस्टमनला टपाल खात्याच्या अनेक महत्वपूर्ण, जनउपयोगी योजनांची माहिती देण्यासाठी पोस्टमनच्या सायकलचा वापर जाहिरातीसाठी केला जात आहे. त्याव्दारे सुकन्या योजना व टपाल विमा योजनेच्या जाहिराती केल्या जात आहेत. यातून पत्रे वाटण्याबरोबर पोस्टमनच्या या सायकलव्दारे उपयुक्त योजनांची माहिती घराघरात पोहचत आहे त्यामुळे पोस्टमनला ब्रॅंण्डऍम्बेसिडरचा लुक आला आहे. 

पोस्टमनच्या सायकलला पत्र्याचीं डगी बसविली आहे. त्यावर जाहिरात आहे. तर सायकलच्या मधील लोखंडी अँगलला पत्र्याचा फलक आहे त्यावर सुकन्या योजना व ग्रामीण टपाल जीवन विमा जाहिरात लावली आहे. या साऱ्यासाठीचा सर्व खर्च टपाल विभागाने केला आहे. 

शहरातील रमणमळा, शनिवार पेठ, शिवाजी विद्यापीठ, मार्केट यार्ड अशा शहरातील दहा टपाल कार्यालयाकडील जवळपास 60 ते 70 पोस्टमनकडे स्वतःच्या सायकल आहेत. त्याव्दारेच पत्र वाटपाचे काम केले जाते त्या सायकलवर टपाल विभागाने स्वखर्चाने या जाहिराती केल्या आहेत. पोस्टमन पत्र वाटण्यासाठी सायकल घेऊन जातात तेव्हा या जाहिराती बघून अनेक लोक त्यांना योजनेची माहिती विचारतात. तेव्हा पोस्टमनही हौसेने ही योजनेची माहिती देतात. 

सुकन्या योजनाही मुलगीच्या जन्मानंतर वयाच्या दहा वर्षात योजनेत सहभागी होता येते. 250 रूपये ते दिड लाखाची रक्कम यात भरता येते मुलीच्या 21 व्या वर्षी रक्कम काढता येते त्याला चांगले व्याजही मिळते. त्यासाठी मोजकी कागदपत्रे लागतात यात (मुलीचा जन्म दाखला, आई वडीलाचे पॅनकार्ड, दोन फोटो आधार कार्ड) थोड्या फारफरकांनी ग्रामीण टपाल जीवन विमाही अशी योजना आहे यात शेतकरी, खासगी नोकरदार किंवा शासकीय नोकरदारांसाठीही योजनांचा लाभ देता यात 1 लाखाचा विमा आहे. त्यासाठी महिन्याला ठरावीक रक्कमचा हप्ता भरता येतो. असे या योजनेचे स्वरूप आहे. 

अशी मिळते माहिती 
एक पोस्टमन दिवसाला किमान दहा ते पंधरा गल्लीतून पत्र वाटप करीत जातो. रोज किमान 30 ते 125 पत्रांचे वाटप होते त्यासाठी किमान 30 ते 40 ठिकाणी थांबावे लागते पत्र देऊन येई पर्यंत सायकल जागेवर थांबविलेली असते या कालावधीत या सायकल वरील जाहिराती अनेक जण वाचतात योजन विषयीचे तपशील पोस्टमनकडून जाणून घेतात यातून अनेकजण टपाल खात्याच्या योजनांचा लाभ घेतात. असा अनुभव अरुण देशपांडे यांनी सांगितला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com