
विटा : उत्पादनापेक्षा बाजारात अंड्याला चांगली मागणी असताना ‘नेक’ने (राष्ट्रीय अंडी समन्वय समिती) जाणूनबुजून दर पाडले आहेत. प्रतिअंडे १ रुपया २० पैसे दर उतरविला आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होत असल्याने अंडी समन्वय समितीविषयी पोल्ट्री व्यावसायिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.