
-संजय कुंभार
दुधोंडी : ऐन नव्या वर्षाच्या तोंडावर कुंडल प्रादेशिक योजनेचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने पुन्हा खंडित केल्याने दुधोंडीसह पलूस तालुक्यातील तेरा गावे व वाड्या -वस्त्यांवरील पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरवातीलाच नागरिक विशेषत: महिला वर्गाला पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.