नगरसह नाशिकमध्ये सात हजार कृषिपंपांना वीजजोडणी

Power supply to seven thousand agricultural pumps in Nashik district
Power supply to seven thousand agricultural pumps in Nashik district
Updated on

नगर ः कृषिपंपांना शाश्‍वत वीजपुरवठा मिळून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने महावितरणने उच्च दाब वीज वितरण प्रणालीद्वारे नाशिक व नगर जिल्ह्यात सात हजार 78 शेतकऱ्यांना वीजजोडणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे बत्ती गुल होण्याच्या कटकटीतून शेतकऱ्यांची अखेर सुटका होणार आहे. 


31 मार्च 2018पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपांना वीजजोडणी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. या अनुषंगाने राज्यस्तरावर पाहणी करण्यात आली. त्यानंतर यासंदर्भात योजना तयार करण्यात झाली. त्यानुसार महावितरणच्या नाशिक शहर मंडलात 1 हजार 385, मालेगाव मंडलात 2 हजार 795, तर नगर जिल्ह्यात 2 हजार 898 अशी एकूण 7 हजार 78 शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्यात आली. उच्च दाब वीज वितरण प्रणाली राबविण्याकरिता जवळपास 490 कोटींचे कार्यादेश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत.

प्रणालीनुसार शेतकऱ्यांना वीजपुरवठा देण्यासाठी प्रामुख्याने 10, 16 व 25 केव्हीए क्षमतेची रोहित्रे लागणार आहेत. यासाठी महावितरणने पूर्वतयारी केली आहे. उच्च दाब वितरणप्रणाली योजनेत एका रोहित्रावर जास्तीत-जास्त दोन ते तीन कृषिपंप असणार आहेत. 

वीजचोरीला बसणार आळा 
प्रणालीमुळे शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनात वाढ होणार आहे. नव्या उच्च दाब प्रणालीत उच्च दाब वाहिन्यांवर आकडे टाकून वीजचोरी करता येणार नाही. रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण कमी होऊन तांत्रिक व वीजहानीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. सर्वांत महत्त्वाचे वीजचोरीला आळा बसणार आहे. 


शेतकरी सुखावला 
नव्या प्रणालीनुसार शेतकऱ्यांना अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा होणार आहे. नाशिकसह नगर जिल्ह्यातील सात हजार 78 वीजजोडणी देण्यात आल्याने शेतकरी मात्र सुखावला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com