युवा शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणं काळाची गरज

विजय लोहार 
Sunday, 24 January 2021

प्रतिक पाटील म्हणाले, अति पाणी वापरामुळे जमीन क्षारपड व नापीक होत आहे. तीन हजार एकरामागे एक हजार एकर जमीन क्षारपड होत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.

नेर्ले (सांगली) : लोकनेते राजारामबापू पाटील व ना.जयंतराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्षातून ३६ जलसिंचन योजना पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. युवा शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, ड्रोनद्वारे औषध फवारणी व गट शेती हे उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानासह स्विकारणे काळाची गरज आहे, असे मत युवक नेते प्रतिक पाटील यांनी व्यक्त केले.

नेर्ले येथील विलासराव पाटील मल्टीपर्पज हॉलमध्ये घेण्यात आलेल्या शेतकरी परिसंवाद व राजारामबापू कार्यक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्ग बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील अध्यक्ष होते. यावेळी प्रतिक पाटील म्हणाले, अति पाणी वापरामुळे जमीन क्षारपड व नापीक होत आहे. तीन हजार एकरामागे एक हजार एकर जमीन क्षारपड होत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. हे चित्र बदलावे लागणार आहे. त्यासाठी एकरी पन्नास हजार रुपये खर्च आहे. शेतकऱ्यांनी दहा हजार रुपये कारखान्याकडे भरून नंतर ३३ महिन्यात उर्वरित रक्कमेची परतफेड करायची आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

यावेळी ऊस विकास अधिकारी सुभाष जमदाडे यांनी ठिबक सिंचन, ड्रोनद्वारे औषध फवारणी व गट शेतीबाबत माहिती दिली. संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. राजारामबापूचे संचालक आनंदराव पाटील, नेर्लेच्या सरपंचा छायाताई रोकडे, माजी सरपंच संभाजी पाटील, कृष्णेचे संचालक सुभाष पाटील, महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, जयकर नांगरे पाटील, प्रदीप पाटील, केदारवाडीचे सरपंच अमर थोरात, युवक राष्ट्रवादीचे सदस्य शुभम पाटील, हेमंत पाटील, हिरोजी पाटील, जयंत फाउंडेशनचे अमर शिंदे, शेतकरी,ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या. स्वागत व  प्रास्ताविक संभाजी पाटील यांनी केले सूत्रसंचलन डी.आर पाटील यांनी केले तर आभार उपसरपंच विश्वास पाटील यांनी मानले.

ड्रोनद्वारे औषध फवारणी 

प्रयोगशील शेतकरी संभाजी पाटील यांच्या शेतात ड्रोनद्वारे औषध फवारणी प्रात्यक्षिक झाले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pratik Patil said that due to excessive use of water the land is becoming saline and barren