कोरोना रूग्ण सापडल्याने अख्या प्रवरा परिसराचीच तपासणी, लोणी केली सील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 एप्रिल 2020

लोणी बुद्रुक येथील बाधित रूग्ण त्याच्या कुटूंबासह एकूण पंचवीस जणांचा संपर्कात आला होता, असे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. या सर्वांना काल रात्री नऊच्या सुमारास तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले.

शिर्डी ः लोणी बुद्रुक येथील एकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सरकारी यंत्रणा सतर्क झाली. लोणी खुर्द व लोणी बुद्रुक ही दोन्ही गावे तातडीने सील करण्यात आली. या दोन्ही गावांसह तीन किलोमिटर अंतरातील सर्वांची तपासणी करण्याचे काम सुरू झाले.

या बाधित रूग्णा बरोबरच प्रवरा परिसरातील पाच गावातील अन्य चोवीस जण तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले होते. आता त्यांना शिर्डी येथील पोलीस ठाण्याजवळ असलेल्या साईसंस्थान च्या धर्मशाळेत कोरंटाईन केले जाईल. अशी माहीती प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी सकाळ शी बोलताना दिली.
ते म्हणाले, लोणी बुद्रुक येथील बाधित रूग्ण त्याच्या कुटूंबासह एकूण पंचवीस जणांचा संपर्कात आला होता, असे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. या सर्वांना काल रात्री नऊच्या सुमारास तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले.

तपासणीसाठी तेरा पथके

लोणी खुर्द व लोणी बुद्रूक परिसरातील सर्वांची आरोग्य तपासणी करण्यासाठी तेरा पथके नेमण्यात आली. त्यात आशा, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचा-यांच्या समावेश आहे. येत्या दोन दिवसात हे काम पूर्ण होईल. तबलीगी जमातमधील काही लोक कोल्हार, दाढ, पाथरे, हसनापूर व लोणी बुद्रुक येथील लोकांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले.या सर्व गावांत विशेष खबरदारी घेतली जात आहे. 

साई संस्थानमध्ये क्वॉरंटाइन वार्ड
तबलीगी जमातमधील लोक परिसरातील कुठे कुठे फिरले याची तपशीलवार माहिती घेतली जात आहे. संपूर्ण तालुक्यात लॉक डाऊन आणखी कडक करण्यात आला. साई संस्थानच्या धर्मशाळेत कोरोंटाईन वार्ड तयार करण्यात आले आहेत. 

- सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपाधीक्षक, शिर्डी.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Pravara area was threatened by corona disease