डिझेल अभावी खरिप पूर्वतयारीची कामे ठप्प : हजारो ट्रॅक्‍टर थांबून

नागेश गायकवाड
गुरुवार, 9 एप्रिल 2020

आटपाडी (सांगली)- संचार बंदीमुळे ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य काणा असलेली शेती व्यवसायाशी संबंधित डिझेल अभावी खरिप पूर्वतयारी कामे पूर्ण ठप्प पडली आहेत. ट्रॅक्‍टर चालकांना वीस लिटर डिझेल साठी ट्रॅक्‍टर घेऊन पंपावर वाऱ्या कराव्या लागतात. यामुळे जवळपास तालुक्‍यातील एक हजार वर ट्रॅक्‍टर पूर्ण विश्रांती घेत आहेत. दरम्यान, अत्यावश्‍यक सेवा समजून शेतीकामांसाठी लागणाऱ्या यंत्रणांना प्रशासनाने इंधन उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. 

आटपाडी तालुक्‍यात रब्बीचा हंगाम संपला आहे. ज्वारीची काढणी झाली आहे. अनेक शेतात कडबा तसाच पडून आहे. हंगाम संपल्यानंतर शेतकरी खरिप पूर्वतयारीच्या कामाला लागतात. अनेक शेतकरी नांगरणी आणि खुरटणी करतात. तसेच शेणखत शेतात सोडले जाते. मान्सूनचा पाऊस झाल्यानंतर शेतकरी बाजरी, मका, भुईमूग याची पेरणी करतात पण त्यासाठीची करावी लागणारी तयारी सध्या पूर्ण ठप्प आहे.

तालुक्‍यात छप्पन गावात एक हजारवर ट्रॅक्‍टर आहेत. लहान गावातही दहा-पंधरा ट्रॅक्‍टर सहज आढळतात. शेतकरयाची कडबा घरी आणून नांगरट आणि मशागत करण्यासाठी धडपडत चालली आहे पण ट्रॅक्‍टर मिळत नाहीत तर ट्रॅक्‍टर चालकांना अपेक्षित डिझेल मिळत नसल्यामुळे ट्रॅक्‍टर धक्‍याला लावले आहेत. ट्रॅक्‍टरला डिझेल देण्याचा प्रशासनाने फतवा काढला. तलाठी आणि ग्रामसेवकाच्या सहीचे पत्र आणि सोबत ट्रॅक्‍टर घेऊन गेल्यानंतरच पंप चालक जेमतेम वीस लिटर तेल देतात. खेडेगावातून तालुक्‍यात पंपावर ये जा करण्यासाठी पाच-सात लिटर तेल जाते. राहिलेल्या तेलातून एक दिवस ही मशागत होत नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी ग्रामसेवक तलाठी यांचे नविन पत्र आणि पंपाची वारी करावी लागते. यामुळे ट्रॅक्‍टर उभा करणे पसंत केले आहे.

तालुक्‍यात 56 गावे असून करगणी, आटपाडी, दिघंची,झरे आणि खरसुंडी या पाच ठिकाणीच पंप आहेत. येथून ग्रामीण गावे आठ, दहा, पंधरा वीस किलोमीटर अंतरावर आहेत. डिझेलसाठी रोजचा प्रवास परवडत नाही. ज्या गावात पंप आहेत ततेथुल प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे इतर पन्नास गावात मात्र डिझेल अभावी शेती कामे ठप्प आहेत. पूर्वतयारीच नसल्यामुळे पुढच्या पेरणी होतील का याबद्दल साशंकता आहे. 

पालकमंत्री यांच्या आढावा बैठकीत हा प्रश्न मांडला होता. यावर ट्रॅक्‍टरना ज्यादा आणि आणि केडात तेल देण्याचा सूचना पालकमंत्री केल्या आहेत 
-वृषाली पाटील, सरपंच, आटपाडी. 

पात्रेवाडी पासून आटपाडी 18 किलोमीटर आहे. वीस लिटर तेलासाठी तेवढा ट्रॅक्‍टर घेऊन जाण परवडत नाही. त्यामुळे ट्रॅक्‍टर उभा केला आहे. दुसरा पर्याय नाही. 
- भीमराव जाधव, शेतकरी पात्रेवाडी. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preparation of kharif preparations due to diesel