सांगलीत 152 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची आतापासूनच सज्जता

अजित झळके 
Wednesday, 23 September 2020

राज्यात मुदत संपलेल्या सुमारे साडेबारा हजार ग्रामपंचायतींची निवडणूक लांबणीवर पडली आहे. तेथे प्रशासक नियुक्ती करण्यात आली आहे, मात्र फारकाळ हा पर्याय परिणामकारक ठरणारा नाही.

सांगली : राज्यात मुदत संपलेल्या सुमारे साडेबारा हजार ग्रामपंचायतींची निवडणूक लांबणीवर पडली आहे. तेथे प्रशासक नियुक्ती करण्यात आली आहे, मात्र फारकाळ हा पर्याय परिणामकारक ठरणारा नाही. त्यामुळे कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर निवडणुका घेण्याचा विचार सुरु आहे.

त्यावेळी पुन्हा तयारीला लागण्यापेक्षा आतापासूनच निवडणूक सज्जता ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींची संपूर्ण माहिती सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासकीय पातळीवर संपूर्ण तयारी असणार आहे. जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतींत रणसंग्राम झडेल. 

कोरोनाचे संकट नसते तर या काळात ग्रामपंचायत निवडणुकांची धामधूम सुरु असती. जिल्ह्यातील गावागांवात वातावरण तापलेले असते, मात्र या काळात संकट मोठे आहे. गावेच्या गावे अडचणीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्यपालांनी या काळात मुदत संपणाऱ्यी ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करता येतील, अशी अधिसूचना जारी केली. त्यानुसार शिराळा तालुक्‍यातील 2, वाळवा तालुक्‍यातील 2, पलूस तालुक्‍यातील 14, कडेगाव तालुक्‍यातील 9, खानापूर तालुक्‍यातील 13, तासगाव तालुक्‍यातील 39, मिरज तालुक्‍यातील 22, जत तालुक्‍यातील 30, कवठेमहांकाळ तालुक्‍यातील 11, आटपाडी तालुक्‍यातील 10 अशा एकूण 152 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पैकी जुलै महिन्यात तीन, ऑगस्ट महिन्यात 87, सप्टेंबर महिन्यात आठ तर नोव्हेंबर महिन्यात 54 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. 

या ठिकाणी निवडणूक कधी होईल, याची निश्‍चिती नाही. परंतू, कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर कोणत्याही क्षणी हा कार्यक्रम लावला जाईल. त्यासाठी राज्यात निवडणूका होऊ घातलेल्या सर्व ग्रामपंचायतींची माहिती राज्य निवडणूक आयोगाने सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ती माहिती मागवण्यात आली आहे. त्यामुळे गाव पातळीवर प्रशासक नियुक्तीनंतर आलेली सुस्ती कमी होईल, अशी अपेक्षा आहे. 

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती 
* कडेगाव तालुका ः अंबक, ढाणेवाडी, कान्हरवाडी, कोतिज, रामपूर, शिरसगाव, शिवणी, सोनकिरे, येतगाव. 
* आटपाडी तालुका ः तळेवाडी, शेटफळे, पात्रेवाडी, लेंगरेवाडी, माडगुळे, घरनिकी, बोंबेवाडी, देशमुखवाडी, धावडवाडी, विठलापूर. 
* वाळवा तालुका ः भाटववाडी, मजुचीवाडी. 
* जत तालुका ः अंकले, अंकलगी, भिवर्गी, धावडवाडी, डोर्ली, घोलेश्‍वर, गुड्डापूर, गुगवाड, जालिहाळ खु, कारेवाडी, कुडनूर, कुलालवाडी, लमानतांडा द., लमानतांडा उटगी, मेंढिगिरी, मोरबगी, निगडे बु., सनमडी, शेड्याळ, शेगाव, सिद्धनाथ, शिंगनहळ्ळी, सोनलगी, तिकोंडी, टोणेवाडी, उमराणी, उंटवाडी, उटगी, वळसंग, येळदरी. 
* तासगाव तालुका ः आळते, बोरगाव, दहीवडी, ढवळी, धोंडेवाडी, धूळगाव, डोंगरसोनी, डोर्ली, गव्हाण, गोटेवाडी, गौरगाव, हातनोली, हातनूर, जरंडी, जुळेवाडी, धामणी, कौलगे, कवठेएकंद, लोकरेवाडी, लोंढे, मांजर्डे, मोराळे पेड, नागाव क., नरसेवाडी, निंबळक, पाडळी, पेड, राजापूर, सावळज, शिरगाव वि., सिद्धेवाडी, तूरची, वज्रचौंडी, विजयनगर, विसापूर, वडगाव, वाघापूर, यमगरवाडी, येळावी. 
* मिरज तालुका ः अंकली, आरग, भोसे, चाबकस्वारवाडी, ढवळी, डोंगरवाडी, एरंडोली, इनाम धामणी, कळंबी, कर्नाळ, कवलापूर, कवठेपिरान, लक्ष्मीवाडी, लिंगनूर, मालगाव, मल्लेवाडी, म्हैसाळ, शिंदेवाडी, शिपूर, तानंग, तुंग, विजयनगर. 
* पलूस तालुका ः सूर्यगाव, तुपारी, रामानंदनगर, तावदरवाडी, नागराळे, नागठाणे, आंधळी, दह्यारी, बुरुंगवाडी, मोराळे, भिलवडी, खंडोबाचीवाडी, भिलवडी स्टेशन. 
* शिराळा तालुका ः बिळाशी, जांभळेवाडी. 
* खापूर तालुका ः नागेवाडी, माहुली, भिकवडी बु., तांदळगाव, खंबाळे भा., मंगरूळ, देवेखिंडी, पारे, रेणावी, मेंगानवाडी, पोसेवाडी, शेंडगेवाडी, भडकेवाडी. 
* कवठेमहांकाळ तालुका ः नांगोळे, इरळी, चोरोची, जांभूळवाडी, तिसंगी, थबडेवाडी, निमज, बनवेडी, मोघमवाडी, म्हैसाळ एम., रायवाडी. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preparations for Gram Panchayat elections from now on