आर आर आबांचे भाऊ आर आर पाटील यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे बंधू राजाराम रामराव पाटील यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. पाटील हे सध्या पिंपरी चिंचवड येथे सहायक पोलिस आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. 

पुणे : माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे बंधू राजाराम रामराव पाटील यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. पाटील हे सध्या पिंपरी चिंचवड येथे सहायक पोलिस आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. 

स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलिस पदकांची घोषणा करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 46 पोलिसाना राष्ट्रपती पदके जाहीर झाली आहेत. राज्यातील  पाच अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

यामध्ये आर आर पाटील यांच्या बंधूच्या नावाचा समावेश आहे. राजाराम रामराव पाटील यांच्या कार्याचा उल्लेख माजी खासदार राजू शेट्टी यांनी लिहिलेल्या 'शिवार ते संसद' या पुस्तकात करण्यात आलेला आहे. शेट्टी यांनी पाटील यांच्या कर्तव्य दक्षतेबद्दलचा एक प्रसंग त्यात रेखाटला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: President Award Announced to ACP Rajaram Ramrao Patil