रघुनाथदादा पाटील यांचे नेतृत्व; कर्नाटक व महाराष्ट्रात ‘जनप्रबोधन’ यात्रा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

शेतकरी, कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

निपाणी : शेतकरी आत्महत्या कलंक पुसण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वात कर्नाटक व महाराष्ट्रात जनप्रबोधन यात्रा निघणार आहे. शनिवार (ता. २८) ते १२ डिसेंबर या काळात निघणाऱ्या प्रबोधन यात्रेची सुरुवात निपाणीतून होईल.

शनिवारी (ता. २८) सकाळी ९ वाजता कोल्हापूर वेशीतील शेतकरी हुतात्मा स्मारक परिसरातून शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या उपस्थितीत निघणाऱ्या यात्रा कार्यक्रमास भागातील शेतकरी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष डॉ. अच्युत माने व कार्यकर्त्यांनी केले आहे.यात्रेच्या नियोजनासाठी आज कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी डॉ. अच्युत माने यांनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा- 5 लाख खर्चून काळ्या दगडात बांधलेल्या ऐतिहासिक वास्तूत घडलेल्या व्यक्तिमत्वांवर एक नजर -

शेतकऱ्यांना कर्जातून व वीज बिलातून मुक्त करणे, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर मदत, शेतीमालाच्या शेती उत्पादनातून तयार होणाऱ्या पक्‍क्‍या मालाच्या किमतीची तुलना कच्च्या मालाशी करणे, शेतकरीविरोधी कायदे रद्द करणे अशा बाबींबद्दल यात्रेव्दारे जागृती होणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले. निपाणीतून निघालेली यात्रा पुढे नेसरी येथे जाईल. तेथे मेळावा झाल्यावर कुरुकली येथे सभा होणार आहे. यावेळी आय. एन. बेग, ॲड. अविनाश कट्टी, बाबासाहेब मगदूम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: President of Maharashtra State Farmers Association Raghunathdada Patil Jan Prabodhan Yatra in Karnataka and Maharashtra