ग्रामीण भागात किराणा दुकानदारांची साठेबाजी ; ग्राहकांची लुट  

निलेश मोरे 
शुक्रवार, 27 मार्च 2020

शहरासह ग्रामीण भागातील किराणा दुकानदार उचलत असून माल शिल्लक नाही, तिकडे भाव वाढले असे सांगून प्रत्येक ग्राहकास संचारबंदीचे भूत दाखवून लुट मार करीत आहेत.

बेळगाव - सध्या कोरोना आजाराच्या पाश्वर्भूमीवर संचारबंदी लागू असली तरी काही किराणा दुकानदांरकडून ग्राहकांची सर्रास लूट होत आहे.

शहरासह ग्रामीण भागातील किराणा दुकानदार उचलत असून माल शिल्लक नाही, तिकडे भाव वाढले असे सांगून प्रत्येक ग्राहकास संचारबंदीचे भूत दाखवून लुट मार करीत आहेत. ११५० रुपयेचे तेल तब्बल १४५० रुपये तर बाकी सर्वच किराणा सामानाला जोरदार लूटमार सुरू असून तहशीलदार व संबंधित आधिकारीनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून अशा किराणा दुकानदांरवर कडक कारवाई करावी, शिवाय प्रत्येक दुकानावर भावफलक, मालाचा स्टॉक याबाबत दररोज नोंदी ठेवण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: price increase grocery in belgaum

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: