esakal | अबब ! संकेश्वर बाजारात बैलजोडीची किंमत चक्क सात लाखांवर
sakal

बोलून बातमी शोधा

अबब ! संकेश्वर बाजारात बैलजोडीची किंमत चक्क सात लाखांवर

संकेश्वर - येथील गेल्या शुक्रवारच्या (ता. 30) जनावर बाजारात बैलजोडीला चक्क 7 लाख 21 हजार रुपये इतकी विक्रमी किंमत मिळाली. येथील दानप्पा कोरी व सोनू शंकर बेळवी यांची ही बैलजोडी सातारा येथील सागर शेठ यांनी विकत घेतली.

अबब ! संकेश्वर बाजारात बैलजोडीची किंमत चक्क सात लाखांवर

sakal_logo
By
आनंद शिंदे

संकेश्वर - येथील गेल्या शुक्रवारच्या (ता. 30) जनावर बाजारात बैलजोडीला चक्क 7 लाख 21 हजार रुपये इतकी विक्रमी किंमत मिळाली. येथील दानप्पा कोरी व सोनू शंकर बेळवी यांची ही बैलजोडी सातारा येथील सागर शेठ यांनी विकत घेतली.

गत महिन्यामध्ये संकेश्वर येथे बेंदूर साजरा करण्यात आला. त्यावेळी दाती बैलजोडी या प्रकारांमध्ये या बैलजोडीने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले होते. याच बरोबर परिसरातील गडहिंग्लज, हुक्केरी, अम्मणगी, जागनूर, नूल, बोरगल व घटप्रभा येथील स्पर्धा व प्रदर्शनात गत वर्षभरात अनेक पारितोषिके पटकावली होती.

बेळवी यांनी ही खिलारी जातीची बैलजोडी गतवर्षी गडहिंग्लज कापशी येथील बाजारातून 5 लाख 55 हजार रूपयांना खरेदी केली होती. आजोबा दानप्पा कोरी यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर तिचे पालनपोषण करून लाखो रूपयांची बक्षीसे मिळविल्याने ती बैलजोडी फायदेशीर ठरली. बेळवी हे खानदानी शेतकरी कुटुंब असून त्यांना बैलजोडी पाळण्याचा शाैक आहे. त्यामुळे यापुढेही जातीवंत बैलजोडया पाळण्याचा मानस आहे.
 
बाजाराच्या इतिहासातील मोठी उलाढाल

संकेश्वर येथे वर्षानुवर्षे जनावरांचा बाजार भरतो. बाजाराच्या इतिहासातील बैलजोडी खरेदी-विक्रीची ही सर्वात मोठी उलाढाल असल्याची माहिती बाजार समितीने दिली.

बैलजोडीची चांगली निगा राखली होती. त्याबद्दल अनेक दर्दी लोकांनी आपली प्रशंसा केली होती. बैलजोडीला इतकी किंमत मिळणे ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे.
- दानप्पा कोरी

loading image
go to top