भाजीपाला दर ढासळले, शेतकरी अडचणीत 

Prices of vegetables have come down, farmers are in trouble
Prices of vegetables have come down, farmers are in trouble

इस्लामपूर (जि. सांगली) : नवनवीन तंत्रज्ञान अवलंब करुन भाजीपाला पिकाकडे वळलेला तरुण शेतकरी वर्ग शेतमालाचा अस्थिर भाव, पिकांचे ढासळलेले नियोजन यामुळे अडचणीत आल्याचे दिसत आहे. कृषी विभागाने फक्त कागदी घोडे दामटण्यापेक्षा प्रत्यक्ष बांधावर जाऊन भाजीपाला पिकांचे नियोजन करण्याबाबत शेतकऱ्यांच्यात प्रबोधन गरज आहे. 

कोरोनाच्या कालावधीत बहुतांशी तरुणवर्ग शेतीकडे वळला आहे. मोठ्या प्रमाणात फळपिकासह ढोबळी, मिरची, टॉमेटो,फ्लावर, कोबी या सारखी जोखमीची पिके घेण्याकडे सर्वांचा कल वाढला आहे. ही बाब ग्रामीण भागाच्या आर्थिक उन्नतीसाठी अभिमानाची आहे. 

परंतु वाढलेल्या भाजीपाला उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळणे तितकेच महत्वाचे आहे. त्यासाठी समंधित विभागाने शेताच्या बांधावर जाऊन भाजीपाला किंवा इतर पिकांचे नियोजन करणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात हे घडत नाही. पिकांचे नियोजन नसल्याने उत्पादनात तफावत जाणवते. कधी भरमसाठ तर कधी कमी उत्पादन होत असल्याने भाजीपाला पिकाना हमिभाव नसल्याने अनेक वेळा शेतकरर्याना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसनिला सामोरे जावे लागत आहे. शेतकर्यंध्ये भाजीपाला पिकाच्या उत्पादन विषयी समन्वय साधने गरजेचे आहे. यासाठी शासनाच्या कृषी विभागाचा सहभाग तळागाळा पर्यंत वाढणे गरजेचे आहे. बाजारपेठेत मागणी नुसार वेगवेगळी फळ पिके, भाजीपाला पिकवणे आवश्‍यक आहे. सर्वानी एका वेळी एकच पिक न निवडता वेगवेगळी पिके निवडली तर त्याचा फायदा सर्वाना होइल. 

शेतमालाला दर आवश्‍यक 
आजची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. हजारो रुपये खर्च करुन हाता तोंडाला आलेली टॉमेटो, फ्लावर यासारखी भाजीपाला पिके कवडीमोल दराने बाजारत विकावी लगत आहेत. यात फायदा तर नाहीच पण या दरात शेतकऱ्यांना शेतातून माल तोडून बाजार पेठेत पाठवणेही परवडत नाही. मजुर, वाहतुकीचा खर्च सुद्धा निघत नाही. या कारणामुळे शेतकरी अधिकाधीक अडचणीत सापडत असल्याने याभाजीपाला पिकाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com