सांगली - दोन वर्षापुर्वी मार्केट यार्ड परिसरात रिलायन्स ज्वेल्स दरोडा प्रकरणातील संशयित प्रिन्सकुमार शिवनाथ सिंग (वय २७, तानापुर, दिलावरपुर, जिल्हा- वैशाली, राज्य- बिहार) यास विश्रामबाग पोलिसांनी आज अटक केली. डेहराडून कारागृहातून त्याचा ताबा घेत ही कारवाई करण्यात आली. गुन्ह्यावेळी दुचाकी पुरवण्यात त्याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.