esakal | सैराटच्या प्रींसप्रमाणे त्याने घेतला बदला; बहिणीच्या नवऱ्याचा कवठेपिरानमध्ये निर्घृण खून 
sakal

बोलून बातमी शोधा

0crime_201_74.jpg

खूनानंतर संशयित आरोपी स्वतः पोलिसठाण्यात हजर

सैराटच्या प्रींसप्रमाणे त्याने घेतला बदला; बहिणीच्या नवऱ्याचा कवठेपिरानमध्ये निर्घृण खून 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा


तुंग (सांगली) : सैराट चित्रपटातील प्रींसने घेतल्या बदल्याप्रमाणे कवठेपिरान (ता. मिरज) येथे बहिणीच्या नवऱ्याचा निर्घृण खून करण्यात आला. ओंकार माने (वय 22) असे मृताचे नाव आहे. खूनानंतर संशयित आरोपी स्वतः पोलिसठाण्यात हजर झाला असून निखिल सुधाकर सुतार (वय .21) असे त्याचे नाव आहे. त्याच्या दोन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ऑनर किलिंगची या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. महिनाभरात गावात खूनाचा दुसरा प्रकार घडल्याने भितीचे वातावरण झाले आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सहा महिन्यांपूर्वी ओंकार माने याने निखील सुतारच्या बहिणीशी काही महिन्यापूर्वी पळून जाऊन विवाह केला होता. त्याचा राग निखिलला होता. विवाह केल्यानंतर काही दिवसांनी ओंकार गावात परत रहायला आला होता. तो ड्रायव्हिगचे काम करत होता. प्रेमविवाहामुळे निखिलला दोघांचाही राग होता. यातूनच रात्री गावतील चव्हाण वाड्याजवळ ओंकार थांबला होता.

त्यावेळी निखील हत्यारासह तेथे आला. त्याने ओंकारवर गुप्तीसारख्या धारदार हत्याराने पोटावर एकच वार केला. तो वार खोलवर यकृत व फुफ्फुसातून थेट हृदयापर्यंत गेला. अति रक्तस्त्राव झाल्याने ओंकारचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर निखील स्वतः पोलिसठाण्यात हजर झाला. तर निखिलच्या अन्य दोन साथिदारांना सांगली ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

 

loading image
go to top