
चीनच्या वुहान प्रांतात अडकलेल्या साताऱ्याच्या अश्विनी पाटील यांच्यासह अन्य भारतीयांची सुटका व्हावी, यासाठी केंद्र स्तरावर पत्रव्यवहार केला आहे. त्याशिवाय चीनच्या दुतावासातील भारतीय अधिकाऱ्यांशीही बोलणे झाले आहे. केंद्राकडून त्यांना भारतात आणण्यासाठी विमानाची सोय केली आहे. त्याचा मेसेज अश्विनी पाटील यांनी पाठवला आहे. त्यामुळे त्या सुरक्षितरीत्या भारतात परत येतील अशी माहिती माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
कऱ्हाड ः कोरोना व्हायरसच्या आजारामुळे चीनमध्ये अडकलेल्या सातारा येथील अश्विनी पाटील यांच्यासह नव्वद भारतीयांना भारतात आणण्यासाठी खास विमानाची सोय केली आहे. 20 फेब्रुवारीला ते विमान चीनकडे रवाना होणार आहे, असा मेसेज अश्विनी यांनी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना पाठवला आहे. त्यामुळे अश्विनी पाटीलसह नव्वद भारतीयही परतणार आहेत.
चीनमधील वुहान प्रांतात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्याने, तेथेच अडकलेल्या साताऱ्याच्या अश्विनी पाटील यांनी व्हिडीओ कॉल करून आमदार चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर अश्विनी यांना सोडविण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रयत्न सुरू केले होते. त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. आमदार चव्हाण यांनी व्हिडीओ कॉल करून मागील चार दिवसांपूर्वी अश्विनी यांच्याशी संवाद साधला होता. आमदार चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परराष्ट्र मंत्रालयाशी पत्रव्यवहार करून अश्विनी यांना लवकरात लवकर भारतात आणण्यास हालचाली कराव्यात, अशी मागणी केली होती. त्यांनी चीन येथील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला होता. त्यामुळे अश्विनी यांच्यासह नव्वद लोक भारतात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अश्विनी यांच्यासह अन्य नव्वद भारतीयांची सुटका होणार आहे, असा मेसेज त्यांनी आमदार चव्हाण यांना पाठवला आहे. त्यांना सोडविण्यासाठी सरकारने मोठी मोहीम हाती घेतली आहे. चीनमध्ये हवाई दलाचे सी 17 ग्लोबमास्टर विमान उद्या (गुरुवारी) पाठवले जाणार असून, ते त्याच दिवशी चीनमध्ये पोचेल.
""चीनच्या वुहान प्रांतात अडकलेल्या साताऱ्याच्या अश्विनी पाटील यांच्यासह अन्य भारतीयांची सुटका व्हावी, यासाठी केंद्र स्तरावर पत्रव्यवहार केला आहे. त्याशिवाय चीनच्या दुतावासातील भारतीय अधिकाऱ्यांशीही बोलणे झाले आहे. केंद्राकडून त्यांना भारतात आणण्यासाठी विमानाची सोय केली आहे. त्याचा मेसेज अश्विनी पाटील यांनी पाठवला आहे. त्यामुळे त्या सुरक्षितरीत्या भारतात परत येतील.''
माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, कराड दक्षिण, जिल्हा सातारा.
दरम्यान अश्विनी पाटील हिने स्वतः बुधवारी (ता. 19) सायंकाळी टि्वटच्या माध्यमातून उद्या (गुरुवार) आम्ही मायदेशी परतणार हाेताे परंतु पुन्हा नव्याने तारीख निश्चित केली जाणार असल्याने उद्याचा प्रवास लांबला आहे. नवी तारीख लवकरच मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
There is a change in the date. Tentative date was originally tomorrow as per the advisory we shared. New date and further details would be intimated at the earliest.
— ashwini patil (@ashwini_patil20) February 19, 2020
वाचा सविस्तर : मुंबई : शिवेंद्रसिंहराजे सुखरुप
जरुर वाचा : महाराज...आमचे ही रक्त सळसळतंय
हेही वाचा : आमदारांच्या घरासमोर वंचित करणार निदर्शने