
यावर्षी वरुणराजाने चांगली साथ दिल्याने कवठेमहांकाळ तालुक्यातील तीन तलावाच्या सांडव्यातून पाणी बाहेर पडत आहे. उर्वरित आठ तलावात अद्याप सरासरी पन्नास ते साठ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
घाटनांद्रे : यावर्षी वरुणराजाने चांगली साथ दिल्याने कवठेमहांकाळ तालुक्यातील तीन तलावाच्या सांडव्यातून पाणी बाहेर पडत आहे. उर्वरित आठ तलावात अद्याप सरासरी पन्नास ते साठ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे तालुक्याच्या शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सद्यातरी मिटला आहे.
यावर्षी कवठे महांकाळ तालुक्यात मान्सून पूर्व,मान्सून,अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.त्यामुळे तालुक्यातील सर्व ओढे, नाले, बंधारे, विहिरी, कूपनलिका पूर्ण क्षमतेने भरले.अद्यापही बहुतांशी भागात ओढे,बंधारे वाहत आहेत.अर्थातच तालुक्यातील भुगर्भाची पाणीपातळी वाढली आहे.एकीकडे या पावसाच्या पाण्याचा द्राक्ष व रब्बी पिकांवर मोठा परिणाम झाला.त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले,तर दुसरीकडे पाणी प्रश्न मिटण्यास मोठी मदत झाली.
दुष्काळी परिस्थितीत द्राक्ष बगायतदारांनी द्राक्ष पीक जतन करण्यासाठी विकतचे टॅंकरने पाणी घालून बागा जागवल्या होत्या.काहींनी पण्या अभावी बागा सोडून दिल्या.आता मात्र तालुक्यातील शेतकरी समाधानी दिसत आहे. तालुक्यातील दहा लघु व एक मध्यम प्रकल्प अशा अकरा तलावांपैकी रायवाडी,दुधेभावी व बसप्पावाडी या तीन तलावाच्या सांडव्यातून पाणी बाहेर पडत आहे.
तालुक्याच्या अकरा तलावातील
पाणीपातळी (द. ल. घ.फु.मध्ये) पुढीलप्रमाणे.....
कुची(75.39),लांडगेवाडी(10.52), रायवाडी(76.61),लंगरपेठ(75.24),नांगोळे (36.73),बोरगांव(37.17),
हरोली(31.84),दुधेभावी(140.63),
घोरपडी(51.60),बंडगरवाडी(56.81)
बसप्पावाडी(273.36)
संपादन : प्रफुल्ल सुतार