'अजितदादा, सांगलीत पिण्याच्या पाण्याचं वांदं झालंय'

महापौर, आयुक्त माझ्यासोबत आहेत. मी आता बैठकीत त्यांच्याशी या विषयावर चर्चा करेन.
'अजितदादा, सांगलीत पिण्याच्या पाण्याचं वांदं झालंय'

सांगली : कृष्णा नदीच्या (krushna river) महापुराची पाहणी करण्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्याशी सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आज चर्चा केली. ‘अजितदादा, महापुराने घाला घातलाच, पण पिण्याच्या पाण्याचेही वांदे झाले आहेत. इथले जॅकवेल पाण्याखाली जाते. (sangli flood) ते तेवढे हलवा आणि महापूर आला तरी पाणी पुरवठा सुरु राहिला पाहिजे, अशी व्यवस्था करा’, अशी मागणी त्यांनी केली.

समितीचे सतीश साखळकर यांनी अजित पवार यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली. सन २०१९ च्या महापुरात जॅकवेल पाण्याखाली गेले. वीज पुरवठा बंद करावा लागला. (sangli ajit pawar tour) सहा दिवस शहराला पाणी मिळाले नाही. आता तीच परिस्थिती आहे. त्यातून आपण धडा घेतला नाही, सुधारणा केल्या नाहीत, अशी खंत सांगलीकर म्हणून व्यक्त केली. त्यावर अजित पवार म्हणाले, ‘‘हा महत्वाचा विषय आहे. महापौर, आयुक्त माझ्यासोबत आहेत. मी आता बैठकीत त्यांच्याशी या विषयावर चर्चा करेन.’’

'अजितदादा, सांगलीत पिण्याच्या पाण्याचं वांदं झालंय'
अजितदादा म्हणाले, ‘एवढा पाऊस पडला की..’

महापुराचे गणित कुठे चुकले, एवढा महापूर कसा काय आला, याविषयी सांगलीकरांच्या मनात शंका दाटल्या आहेत. त्याचा खुलासाही पवार यांनी लोकांशी चर्चा करताना केला. ते म्हणाले, ‘‘धरण क्षेत्राबाहेर झालेल्या अतिवृष्टीचा यंदा फटका बसला. एवढा महाप्रचंड पाऊस झाला की त्यावर नियंत्रण ठेवताच आले नाही.’’

दरम्यान, सांगलीकरांची गेल्या दोन दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी फरफट सुरु झाली आहे. पाणीपुरवठा पूर्ण बंद आहे. पिण्याचे पाणी घ्यायला रांगा लागल्या आहेत. खर्चाला पाणी नाही. आंघोळीचा पत्ता नाही. अशा स्थितीत लोक वैतागले आहेत. महापूर पात्रात कधी जाणार आणि जॅकवेल सुरु कधी होणार, याचे उत्तर कुणाकडेच नाही. तोवर पाणीबाणी कायम राहणार आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडे याविषयी तक्रार केल्यानंतर तरी जॅकवेलबाबत निर्णय होतो का, याकडे आता लक्ष असेल.

'अजितदादा, सांगलीत पिण्याच्या पाण्याचं वांदं झालंय'
भिलवडी बाजारपेठेची अजित पवार यांच्याकडून बोटीतून पाहणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com