खणभागातील अंतर्गत रस्त्यासाठी भूसंपादनाचा प्रस्ताव...महासभेत निर्णय

बलराज पवार
Thursday, 16 July 2020

सांगली-  खणभागातील पंचमुखी मारुती मंदिरासमोरुन शिकलगार गल्लीसह अंतर्गत भागात जाणाऱ्या रस्त्यासाठी भूसंपादन करण्याचा प्रस्तावर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यास महासभेत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांसाठी लवकरच रस्ता खुला होण्याची शक्‍यता आहे. 

सांगली-  खणभागातील पंचमुखी मारुती मंदिरासमोरुन शिकलगार गल्लीसह अंतर्गत भागात जाणाऱ्या रस्त्यासाठी भूसंपादन करण्याचा प्रस्तावर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यास महासभेत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांसाठी लवकरच रस्ता खुला होण्याची शक्‍यता आहे. 

पंचमुखी मारुती मंदिरासमोरच्या रस्त्याने शिकलगार गल्लीसह परिसरात जाण्यासाठी पूर्वी अंतर्गत रस्ता होता. पण तो खासगी मालकीचा असल्याने जागा मालकाने अडविला होता. त्याच्या भूसंपादनाचा प्रस्ताव अनेक वर्षे प्रलंबित होता. भाजपच्या नगरसेविका ऍड. स्वाती शिंदे यांनी अनेक वर्षे हा प्रश्‍न लावून धरला. विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, माजी महापौर हारुण शिकलगार, नगरसेविका सुनंदा राऊत आदींनी यासाठी प्रयत्न केले होते. 

आज महासभेत या जागेच्या भूसंपादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्यास मंजुरी देण्यात आली. या जागेपोटी संबंधित जागामालकाला एआर किंवा टीडीआर देऊन तो ताब्यात घेण्यात येणार आहे. आमराईतील लाकडांच्या विक्रीच्या प्रस्तावावर ऍड. स्वाती शिंदे यांनी उद्यान अधीक्षक शिवप्रसाद कोरे यांना जाब विचारला. महापालिका अंत्यसंस्कारासाठी तीन हजार रुपये टनाने लाकूड विकत घेते. मग महापालिकेच्या लाकडाची विक्री 1800-2000 रुपयांनी का? वर्षानुुवर्षे हा गोलमाल सुरू आहे. महापौर सौ. सुतार यांनी जागेवर पाहणी करून निर्णय घेण्याचे आदेश दिले. 
ऍड. स्वाती शिंदे यांनी यावेळी महापालिका क्षेत्रामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पाच दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्याची मागणी केली. नागरीकांना पूर्वकल्पना देऊन कडक लॉकडाऊन करावे अशी सूचना केली. 

महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या विचारात घेता किमान पाच हजार कोरोना चाचणी किट्‌स जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेने मागून घ्यावीत आणि दाट लोकवस्ती असणाऱ्या भागांमध्ये कोरोना टेस्टिंगची मोहीम महानगरपालिकेने हाती घ्यावी असेही त्या म्हणाल्या. रुग्ण तपासण्यास नकार देणाऱ्या खासगी रुग्णालयांची महापालिकेने भरारी पथक स्थापन करून तपासणी करावी. दवाखाने बंद आढळल्यास संबंधित दवाखान्यांचे परवाने तात्काळ रद्द करावेत अशी मागणी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Proposal for land acquisition for internal road in KHANBHAG area . decision in the general meeting