सांगली महापालिका क्षेत्रासह उर्वरीत जिल्ह्यात जनता कर्फ्यू : जिल्हाधिकारी डॉ. चौधरी

विष्णू मोहिते
Tuesday, 8 September 2020

सांगली- जिल्ह्यात काही गावात व पाच प्रमुख शहरात सध्या जनता कर्फ्यू सुरू आहे. यापुढे महापालिका क्षेत्र आणि उर्वरीत जिल्ह्यातही जनतेने शुक्रवार (11) पासून दहा दिवस जनता कर्फ्यू उत्स्फूर्तपणे पाळावा. प्रशासनाने यासाठी कोणतेही आदेश दिलेले नाहीत. अत्यावश्‍यक सेवा वगळता व्यापार, व्यवसायिकांनी बंद मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन  जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. 

महापालिका क्षेत्रात गेल्या आठवड्यापासून लॉकडाउनबाबतची चर्चा होती. मात्र पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत लॉकडाउन नको, जनता कर्फ्यू पाळा, असे आवाहन केले होते. गेल्या दोन दिवसापासून लॉकडाऊन जाहिर करता येत नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे जनता कर्फ्यूचाच पर्याय प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यापुढे होता. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे.

जिल्ह्यात 18 हजार कोरोना रुग्ण आणि मृत्यूची संख्याही तब्बल सातशेवर पोहोचली आहे. दररोज मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 30 च्या घरात पोहोचली आहे. सांगलीसह जिल्ह्यात लॉकडाउनबाबतची मागणी होत होती. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी त्या मागणीवर पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे सकारात्मक विचाराबाबत शिफारस केली होती. जनता कर्फ्यूबाबत जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, "जनता कर्फ्यू काळात सर्वांचे सहकार्य अपेक्षीत आहे. कोणत्याही बंदोबस्ताशिवाय हा बंद ठेवला जाईल. प्रशासनाने यासाठी कोणतेही आदेश दिलेले नाहीत. जनतेने कर्फ्यू उत्स्फूर्तपणे पाळायचा आहे. कोणावरही सक्ती केली जाणार नाही. बंद म्हणून कोणीही गर्दी करू नये.'  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Public Curfew in Sangli Municipal Corporation Area and Rest of the District: Collector Dr. Chaudhary