संचारबंदीत सुरु आहे अशीही जनसेवा

 Public service is also going on in lock down
Public service is also going on in lock down

सांगली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या शहरात संचारबंदी सुरु आहे. नागरिकांना जीवनावश्‍यक गोष्टी मिळत असल्या तरी काही भागातील वृध्द नागरिकांना तेथे जाण्यातही अडचणी आहेत. अशा नागरिकांसाठी सामाजिक कार्यकर्ते पुढे येत आहेत. 

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर आणि त्यांचे पती श्रीरंग केळकर सध्या अशा वृध्द गरजूंना मदत करीत आहेत. विशेष करुन वृध्द नागरिकांना संचारबंदीच्या काळात बाहेर पडणे अवघड होते. त्यांच्यापर्यंत सुविधाही पोहोचत नाहीत, अशा व्यक्तींना ते मदत करीत आहेत. सध्या पाच जणांना ते नाश्‍ता, जेवण पुरवण्याचे काम चेतना पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांमार्फत सुरू आहे. तर तीन व्यक्तींना घरी वैद्यकीय सुविधा पोहोचवण्यात मदत केली जात आहेत. 

श्री. केळकर म्हणाले,""पुण्यात नोकरी, शिक्षण, व्यवसायानिमित्त राहणाऱ्या तरुणांचे माता, पिता सांगलीत आहेत. अशांना या संकटाच्या काळात मदतीची गरज आहे. सध्या पाचजणांना आम्ही नाश्‍ता, जेवण, पाणी पुरवण्याचे कार्य करतो. तीन व्यक्तींना घरीच वैद्यकीय सुविधा देण्याचे काम केले आहे. त्यांच्यासाठी डॉक्‍टरची सोय केली आहे. या काळात वृध्दांना अशी मदत करण्याची गरज असते. त्यांना घराबाहेर जाता येत नसल्याने आम्ही या सोयी उपलब्ध करुन दिल्या आहेत. अशा आणखी काहीजणांना आम्ही सुविधा उपलब्ध करुन देऊ शकतो.'' 

प्रभाग 18चे नगरसेवक अभिजित भोसले यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी किराणा, दुध, भाजीपाला, वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांचे गट केले आहेत. त्यांच्या माध्यमातून ते नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तू उपलब्ध करुन देतात. नागरिकांकडून विचारणा झाल्यास त्यांना जवळच्या दुकान, दवाखाना, मेडिकल, दुध, भाजीपाला विक्रेता यांची माहिती दिली जाते. गरज पडल्यास वृध्द नागरिकांना सेवा दिली जाते.'' 

श्री. भोसले म्हणाले,""नागरिकांना मदत करण्यासाठी ऑनलाईन ऍप सुरु करीत आहे. त्यावर प्रभागातील दुकानदार, भाजीविक्रेते, मेडिकल, गिरणी यांची यादी उपलब्ध करुन देणार आहे. त्यावर नागरिकांनी आपली ऑर्डर नोंदवल्यास त्यांना घरपोच सेवा मिळेल असा प्रयत्न आहे. 
शहरातील विविध भागात असे सामाजिक कार्यकर्ते आपल्यापरीने संचारबंदीच्या काळात गरजूंना मदत करत आहे. यापुढेही ही गरज वाढत जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांनी समाजातील वृध्द गरजूंना मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com