
Pune Sangli Crime : कर्नाटकात किराणा मालाच्या खरेदीसाठी जात असलेल्या मुळशी (जि. पुणे) येथील व्यापाऱ्याकडील सात लाख रुपये लुटल्याची घटना बेडगजवळ शनिवारी पहाटे चारच्या सुमारास घडली. याप्रकरणी लक्ष्मण शिदोजी कदम (रा. मुळशी) यांनी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोयत्याने हल्ला करून रोकड लुटण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असला, तरी लुटारूंना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.