कोल्हापूर : पुण्यातील दाम्पत्याची रुकडीत रेल्वेखाली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

  • पुणे येथील दाम्पत्याने रुकडी (ता. हातकणंगले) येथे रेल्वेखाली आत्महत्या.
  • अविनाश कालेकर (वय 45) व हर्षदा कालेकर (वय 35) अशी मृतांची नावे.
  • आत्महत्येमागचे नेमके कारण अस्पष्ट.
  • सकाळी आठच्या सुमारास कोल्हापूरहून हैद्राबादकडे जाणाऱ्या हैद्राबाद एक्स्प्रेसखाली दाम्पत्याची आत्महत्या.

रुकडी - पुणे येथील दाम्पत्याने रुकडी (ता. हातकणंगले) येथे रेल्वेखाली आत्महत्या केली. अविनाश कालेकर (वय 45) व हर्षदा कालेकर (वय 35) अशी मृतांची नावे आहेत. आत्महत्येमागचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. सकाळी आठच्या सुमारास कोल्हापूरहून हैद्राबादकडे जाणाऱ्या हैद्राबाद एक्स्प्रेसखाली या दाम्पत्याने आत्महत्या केली.

रुकडी रेल्वेस्थानकपासून अर्धा किलोमीटरवर हातकणंगले मार्गावर देसाई विहीर नजीक ही घटना घडली. हैदराबाद एक्स्प्रेसचे गार्ड यांनी रुकडी रेल्वेस्थानक  इनचार्ज यांना या घटनेची माहिती दिली. यानंतर इनचार्ज यांनी ही घटना कोल्हापूर रेल्वे पोलिसांना कळवली.

घटनास्थळी पोलिस लवकर न पोहोचल्याने मृतदेह उशीरापर्यत घटनास्थळी पडून होते. पोलीस दाखल झाल्यानंतर मृतदेह कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पीटलकडे उत्तरीय तपासणीस नेण्यात आले. घटनास्थळी मिळालेल्या मोबाईल व ओळखपत्रावरून त्यांच्या नातेवाईकांना या घटनेची कल्पना देण्यात आली. अधिक तपास पोलीस कर्मचारी सदाशिव पाटील व मुख्य पोलीस अधिकारी सुनिल नीळकंठ करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune couple commit suicide under Railway Near Rukadi in Kolhapur