पुणे - मुंबईकरांनो, आपली मदत पुरग्रस्तांपर्यंत रेल्वे पोहोचवणार

संतोष भिसे
रविवार, 11 ऑगस्ट 2019

मिरज - पुरस्थितीमुळे सांगली व कोल्हापूकडे येणाऱ्या बहुतांश रस्ते बंद झाल्या आहेत. पुणे - मुंबईतून मदतीचे हजारो हात येताहेत, पण त्यांना रस्त्यांअभावी पुरग्रस्तांपर्यंत पोहोचता येत नाही. ही कोंडी फोडण्यासाठी रेल्वेने पुढाकार घेतला आहे. मुंबई व पुण्यातील नागरीकांनी तेथील स्थानकांत मदत आणून द्यावी, ती सांगली व कोल्हापूरपर्यंत पोहौचवली जाईल, असे रेल्वेने जाहीर केले आहे.

या संदर्भात पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रा. कृष्णा आलदर यांनी पुणे विभागीय व्यवस्थापक मिलींद देऊसकर यांच्याशी संपर्क साधला. रस्त्यांअभावी मदत पोहोचत नसल्याचे सांगितले. त्यानंतर श्री देऊसकर यांनी वरिष्ठांशी चर्चा केली, मदतसाहीत्य पोहोचवण्यासाठी सांगली - मिरजेकडे जाणाऱ्या प्रत्येक गाडीला जादा डबा जोडण्याचा निर्णय घेतला. 
नागरिकांनी मुंबई व पुणे स्थानकांत बंदीस्त स्वरुपात मदत आणून द्यावी, ती सांगलीला पोहोचवली जाईल, असे देऊसकर यांनी सांगितले. 

दरम्यात, मिरज ते कोल्हापूर लोहमार्गाची दुरुस्ती सुरु करण्यात आली असून या मार्गावरुन आज संध्याकाळी किंवा सोमवारी दुपारपर्यंत रेल्वेवाहतूक सुरु होईल, असे देऊसकर म्हणाले. रेल्वे रुळाखालून वाहून गेलेली खडी भरण्याचे काम सुरु झाले आहे. पंचगंगेच्या पाण्याच्या दबावाने लोहमार्गालगतच्या भरावाची हानी झाली आहे काय याचीही खात्री केली जात आहे. कृष्णा नदीवर अंकली येथील जलस्तराचाही अंदाज रेल्वेचे अधिकारी घेत आहेत.

रेल्वेने मदत पाठवण्यासाठी यांच्याशी करा संपर्क - 
प्रा, कृष्णा आलदर मो. 8177815670

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune - Mumbai, the railway will reach the affected people