Lonavala Karjat railway landslide update
esakal
मिरज : लोणावळा–करजात घाट विभागातील मंकी हिल केबिन आणि ठाकूरवाडी केबिनदरम्यान सोमवारी (ता.६) पहाटे रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने पुणे–मुंबई रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला. या घटनेमुळे मध्य रेल्वेने अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गात आणि वेळापत्रकात तातडीने बदल केले असून प्रवाशांची मोठी गैरसोय झाली (Koyna Express delayed due to landslide) आहे. पुण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.