
विटा : दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला व त्या दुचाकी विकत घेणाऱ्या अशा दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. प्रीतम सदाशिव शिंदे (वय २१, पारे, ता. खानापूर) व बादल अब्दुल पिरजादे (वय ३२, विटा) अशी संशयितांची नावे असून, त्यांच्याकडून ३ लाख ८५ हजारांच्या १० दुचाकी जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली.