पलूसमध्ये पाच बेकरी चालकांवर दंडाची कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

सांगली - स्वच्छतेचा अभाव आणि त्रुटीमुळे पलूस येथील पाच बेकरी चालकांना 52 हजार 500 रूपयाचा दंड करण्यात आला. अन्न व औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली. 

सांगली - स्वच्छतेचा अभाव आणि त्रुटीमुळे पलूस येथील पाच बेकरी चालकांना 52 हजार 500 रूपयाचा दंड करण्यात आला. अन्न व औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली. 

न्यू गुरूप्रसाद बेकरी जुने बसस्थानकाजवळ, नवीन बसस्थानकाजवळील बालाजी केक शॉप अन्ड स्वीट मार्ट, बेंगलोर अयंगार बेकरी, केक ऍन्ड कुकीज शॉपी आणि गुंडा दाजी चौकातील लक्ष्मी बेकरी या पाच बेकरी चालकांना दंड करण्यात आला आहे. यापैकी न्यू गुरूप्रसाद, बालाजी केक शॉप, लक्ष्मी बेकरी यांना उत्पादन कक्षातील स्वच्छता व इतर त्रुटीबद्दल सुधारणा करण्यासाठी नोटीस बजावली आहे. तर न्यू गुरूप्रसाद बेकरीमधील अस्वच्छतेबद्दल त्यांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत. 

अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार नोंदणीकृत दुकाने, बेकरी आदी आस्थापनांची तपासणी केली जाते. त्रुटी आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. पलूसमध्ये नुकतीच पथकाने तपासणी मोहिम राबवली होती. तेंव्हा पाच बेकऱ्यांत स्वच्छता नसल्याचे आढळले.

लेबलवरील माहितीत व इतर गोष्टींमध्ये त्रुटी आढळली. त्यानुसार कारवाई करण्यात आली. अन्न व औषधचे सहाय्यक आयुक्त एस. ए. चौगुले, अन्न सुरक्षा अधिकारी डी. एच. कोळी, श्रीमती एस. व्ही. हिरेमठ, नमुना सहाय्यक तानाजी कवळे यांच्या पथकाने कारवाई केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punishment action against five bakery operators in Palus