Walwa Sangli farmer loan waiver list 2026
esakal
ईश्वरपूर (जि. सांगली) : वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत असलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर (Walwa Sangli farmer loan waiver list 2026) झाली आहे. या टप्प्यात तालुक्यातील दोन हजार ८२४ शेतकऱ्यांना १० कोटी २० लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मंजूर झाला आहे. मात्र, लाभार्थ्यांपैकी ५२० शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणिकरण पूर्ण केले नसल्याने त्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.