
सांगली - 'पुष्पा २' सिनेमा नुकताच प्रदर्शीत झाला आहे. हाऊसफुल्ल असणाऱ्या सिनेमात आज पुष्पा फॅन पोहचला... ‘पुष्पा ब्रँड’चा मोह त्यालाही आवरला नाही अन् त्याने चक्क कपडे काढले. त्यानंतर तो थिएटरमध्येच नाचू लागलात. पुष्पा फॅनचा हा धिंगाणा पोलिसांना समजला. शहर पोलिसांनी त्या फॅनला ताब्यात घेत चांगलाच खाक्या दाखवला. पुन्हा हा पुष्पा फॅन चित्रपटाचा नादच करणार नाही.