त्यांच्या घरावर स्टीकर्स लावा 

 Put stickers on the home of the home quarantine
Put stickers on the home of the home quarantine
Updated on

सांगली : जिल्ह्याबाहेरुन आलेल्यांना होम क्वारंटाईन केले आहे. त्यांच्या घरावर स्टीकर्स लावावित आणि त्यांच्यावर नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, अशा सूचना आयुक्त नितीन कापडनीस यांनी आज नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत दिल्या.

त्यांनी आज कोरोना नियंत्रण व महापूर व्यवस्थापनाबाबत करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी नगरसेवकांची बैठक घेतली. त्यांनी कोरोनाबाबत जर होमक्‍वांरटाईन केलेले लोक नियम पाळत नसतील तर त्यांची माहिती प्रशासनाला द्यावी आणि कारवाईस सहकार्य करावे, असे आवाहन केले. बाहेरुन येणाऱ्यांची संख्या जास्त झाल्यास संस्थात्मक क्वारंटाईनसाठी शाळांची मदत घेऊ. प्रभागनिहाय सामाजिक संघटना, कार्यकर्त्यांची यंत्रणा तयार ठेवा, असे आवाहनही केले. 


धीरज सूर्यवंशी म्हणाले,""शहरात कंटेन्मेंट झोनमध्ये काम करणाऱ्या आरोग्य अधिकारी, आशा वर्कर्स, सफाई कामगारांना मास्क, सॅनेटायझरसह पीपीई कीट देण्यात यावेत. महापालिकेच्या इतिहासात चांगली नालेसफाई झाल्याने पुराचा धोकाही टळेल. 

ऍड. स्वाती शिंदे म्हणाल्या,""कोरोना रोखण्यासाठी अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींना प्रवेश देऊ नये असे महापालिकेनेही प्रशासनास पत्र द्यावे. आता महापुराचाही धोका आहे. त्याबाबत उपाययोजना करण्याची तयारी करावी.'' 
पाऊस भरपूर झाल्या व पूर आल्यास आपत्तीसाठी बोटी, लाईफ जॅकेटस्‌, जेसीबीसह सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवावी. कोयना धरण 50 टक्के भरलेले आहे. पावसाळ्याचा अंदाज घेऊन आतापासूनच दुष्काळी भागासाठी पाणी सोडावे. अलमट्टी धरणाशी समन्वय ठेवून धोका टाळावा. 

पूरपट्ट्यातील नगरसेवकांनी लोकांना पाणी वाढण्यापुर्वीच अंदाज घेऊन सक्तीने स्थलांतर करण्यास भाग पाडावे अशी मागणी केली. यावर श्री. कापडनीस यांनी उपाययोजनांची हमी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan resort swimming pool accident
Why is kharif sowing delayed in Sangli?
Sangli Satara MLC election result 2026
Investigation Update: Mhamdya Nadaf’s Role in the Murder Conspiracy
Marathi News Esakal
www.esakal.com