सांगलीतील क्वारंटाइन सेंटरवरून  जबरी चोरीतील दोघा कैद्यांचे पलायन 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

याबाबत कारागृह प्रशासनाने तातडीने शोध मोहिम सुरू केली असून विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद केली.

सांगली ः येथील एका महाविद्यालयातील क्वारंटाइन सेंटरच्या खिडकीचे गज वाकवून जबरी चोरीली दोघा कैद्यांनी पलायन केले. पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत कारागृह प्रशासनाने तातडीने शोध मोहिम सुरू केली असून विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद केली. 

कोल्हापूर रस्त्यावर एका ट्रक चालकास 23 ऑगस्ट रोजी कोयत्याचा धाक दाखवून लुटले होते. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी 17 सप्टेंबर रोजी चौघांना अटक केली. त्यातील दोघांची कोरोनाचा चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांना शहरातील एका महाविद्यालयात क्वारंटाइन करण्यात आले होते. 

आज पहाटे दोघांनाही खिडकीच्या काचा फोडून गज वाकवून पलायन केले. ही घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. कारागृह प्रशासनाकडून तातडीने शोध मोहिम राबवली जात आहे. विश्रामबाग पोलिसांनीही तातडीने पथके रवाना केली आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From the quarantine center in Sangli Escape of two prisoners of robbery