esakal | झेडपीच्या इशाऱ्याचेच "विसर्जन ? शेतीशाळेच्या जागेत पून्हा विसर्जन तळे
sakal

बोलून बातमी शोधा

झेडपीच्या इशाऱ्याचेच "विसर्जन ? शेतीशाळेच्या जागेत पून्हा विसर्जन तळे

शिक्षण समितीने या जागेत विसर्जन तळे खोदू नये, असा ठराव घेतला आहे. तळे खोदण्यासाठी आम्ही कोणतीही परवानगी दिली नाही.
राजेश पवार, सभापती, शिक्षण व अर्थ समिती, जिल्हा परिषद. 

झेडपीच्या इशाऱ्याचेच "विसर्जन ? शेतीशाळेच्या जागेत पून्हा विसर्जन तळे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : जिल्हा परिषदेच्या शेतीशाळेतील जागा विसर्जन तळ्यास न देण्याचा निर्णय सप्टेंबर 2018 मधील सर्वसाधारण सभेत घेतला होता. शिवाय, शिक्षण समितीनेही जागा न ठेण्याचा ठराव केला होता. मात्र, जिल्हा प्रशासनाने याच जागेत विसर्जन तळे खोदून जिल्हा परिषदेच्या इशाऱ्याचेच "विसर्जन' केले. या जागेचा विषय शिक्षण विभागाकडे असून, त्यांच्याकडून परवानगी घेतली नसल्याची बाब समोर येत आहे. 

सातारा शहर व परिसरातील गणेशमूर्ती विसर्जनाच्या विषयावर मागील वर्षी रणकंद माजले होते. त्यावरून राजकीय, प्रशासकीय कलगीतुरा सुरू झाला होता. अंतिम टप्प्यात विभागीय आयुक्‍तांनी जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या प्रतापसिंह शेतीशाळेच्या जागेत विसर्जन तळे खोदले. त्या वेळी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या मुद्‌द्‌यावरून वादंग उठले होते. 

या सभेत दीपक पवार यांनी जिल्हा परिषदेच्या जागेत विसर्जन तळ्यास जागा न देण्याचा ठराव केला होता, तरीही जागा दिली. आपण रखवालदार असून, रखवालदार झोपला तर काहीच राहणार नाही, असा आरोप केला होता. 
त्यावर अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी लेखी परवानगी आपण दिली नाही. विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी अडचणींचा विचार करून जागा अधिग्रहण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. यापुढे कोणत्याही कारणासाठी अशी जागा देणार नाही, असा खुलासा केला होता. 
मात्र, जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती होण्यापूर्वीच प्रशासनाने प्रतापसिंह शेतीशाळेच्या जागेत तळे खोदले आहे. ही जागा सध्या शिक्षण समितीच्या अखत्यारित असून, शिक्षण समितीने विसर्जन तळ्यासाठी जागा न देण्याचा ठरावही घेतला आहे. महसूल, नगरपालिका प्रशासनाने जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात न घेताच तळे खोदून सर्वसाधारण सभेच्या इशाऱ्याचेच "विसर्जन' केले. 

पालिकेला हवीय जागा 

सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी सांगितले की, विसर्जन तळ्यासाठी गेल्यावर्षीच परवानगी घेतली आहे. त्यामुळे ते तळे बुजविले नव्हते. पालिकेने यापूर्वीच तेथे बागेसाठी आरक्षण टाकले आहे. कायमस्वरुपी तळे ठेवण्यासाठी या जागेची मागणी पालिकेने केली आहे. 

loading image
go to top