चौदा गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

मार्तंड बुचूडे
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

पारनेर : आमदार विजय औटी यांनी केलेल्या पाठपुराव्याने तालुक्यातील 14 गावांच्या पाणी योजनांना मंजुरी मिळाली असून त्यासाठी 12 कोटी 53 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार औटी यांच्या पाठपुरावव्यामुळे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून टाकळी ढोकेश्‍वर, राळेगणसिद्धी, कर्जुले हर्या, रांधे, दरोडी, पिंपरी जलसेन या गावतील पाणी योजनांना मंजुरी मिळाली आहे.आता या गावातील पाणी प्रश्न कायमचा मिटणार आहे. 

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल अंतर्गत  तालुक्यातील 14 गावांच्या पाणी योजनांना राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली असून त्या साठी तब्बल 12 कोटी 53 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच निवीदा प्रक्रिया होणार आहेत. अशी माहिती पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे स्वीय सहाय्यक विजय गाडगे यांनी दिली.

या योजना मार्गी लावण्यासाठी औटी यांनी राज्य सरकरकाकडे आग्रही मागणी धरली होती. त्यांच्या  प्रयत्नांना यश आले आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत
 पाणी योजना व त्यासाठी मंजुर  निधी (कौसात ) टाकळी ढोकेश्‍वर (3 कोटी 28 लाख 30 हजार), कर्जुले हर्या (2 कोटी 14 लाख 33 हजार), राळेगण सिद्धी (1 कोटी 25 लाख), चोंभूत (84 लाख 83 हजार), पाडळी दर्या (55 लाख 89 हजार), पिंपरी जलसेन (66 लाख 68 हजार), जाधववाडी(10 लाख 22 हजार), रांधे (89 लाख 87 हजार), वारणवाडी (36 लाख 72 हजार), खडकवाडी (13 लाख 4 हजार), दरोडी (85 लाख 46 हजार), कडुस (94 लाख 42 हजार), पोखरी (50 लाख), पिंपळगाव तुर्क (22 लाख). 
दुष्काळी तालुक्यात पाणी प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठीच्या औटी यांनी अनेक गावांमध्ये जलसंधारणाची कामे मार्गी लावली. शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला. आता या 14 गावांचाही पाणी प्रश्न मिटणार असल्याने तालुक्यतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Web Title: The question of water of fourteen villages will be solved