माेदींच्या सभेसाठी साताऱ्यात येताय ? मग हे वाचाच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी गुरुवारी (ता. 17) सातारा शहरात येत आहेत. येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे.
 

सातारा : येथे गुरुवारी (ता. 17) होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सभेच्या दिवशी शहरातील वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत.
 
लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी गुरुवारी (ता. 17) सातारा शहरात येत आहेत. येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे.

पंतप्रधानांच्या सभेसाठी जिल्ह्यातील विविध भागांतून कार्यकर्ते व नागरिक येणार आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीत बदल करण्याबरोबरच पोलिसांनी वाहनांच्या पार्किंगचेही स्वतंत्र नियोजन केले आहे. याबाबत शहर वाहतुक नियंत्रण शाखेने कळविले आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने बॉम्बे रेस्टॉरंट, गोडोली नाका, जिल्हा परिषद चौक, बांधकाम भवन, होवाळे रुग्णालयासमोरील रस्ता, कनिष्क हॉल या ठिकाणांहून सैनिक स्कूल मैदानाकडे येण्या- जाण्यास सर्व वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

त्याचबरोबर बांधकाम भवन ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक, तसेच कनिष्क हॉल ते जिल्हा परिषद चौक ते अण्णासाहेब कल्याणी शाळा चौक या रस्त्यांवर दोन्ही बाजूला वाहनांचे पार्किंग करण्यालाही बंदी घालण्यात आलेली आहे.

या कालावधीमध्ये पोवई नाका, पेंढारकर चौक, धनंजयराव गाडगीळ महाविद्यालय या बाजूने बॉम्बे रेस्टॉरंटला जायचे असलेल्या वाहनांनी अजंठा चौकमार्गे बॉम्बे रेस्टॉरंटकडे जायचे आहे. मुख्य बस स्थानक, कनिष्क हॉल या बाजूने बॉम्बे रेस्टॉरंटकडे येणाऱ्या वाहनांनी वाढेफाटामार्गे जायचे आहे. कोरेगावबाजूकडून शहरात येणाऱ्या वाहनांनी सोयीनुसार खेड फाटा, सदरबझार, अजंठा चौक, गोडोली नाकामार्गे शहरात यायचे आहे. 

...या ठिकाणी करा पार्किंग 

फलटण, खंडाळा व वाई बाजूने येणाऱ्या वाहनांनी रिमांड होम, जरंडेश्‍वर नाका मारुती मंदिराशेजारील कोयना सोसायटीच्या मोकळ्या मैदानात वाहने लावायची आहेत.

कोरेगाव, खटाव व माण बाजूकडून येणाऱ्या वाहनांनी यशवंत हॉस्पिटलसमोरील पारले ग्राऊंड, पिरवाडी येथील हनुमान मंदिराजवळील मोकळे मैदान, पाटबंधारे कार्यालयाजवळील मोकळे मैदान, पाटबंधारेच्या यांत्रिका विभागाच्या पाठीमागील मोकळ्या मैदानाजवळ वाहने लावायची आहेत. त्याचबरोबर या बाजूकडून येणाऱ्या वाहनांना यशोदा शैक्षणिक संकुल, तसेच औद्योगिक वसाहतीमध्ये एक बाजूला वाहने लावता येतील.
 
कऱ्हाड व पाटण बाजूकडून येणाऱ्या वाहनांनी यशोदा शैक्षणिक संकुल, लक्ष्मी- विलास हाईटस समोर, औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्याच्या कडेला एका बाजूने, शाहूनगर येथील जुने गोळीबार मैदान, ठक्कर सिटी पाठीमागील मोकळे मैदान, गोडोलीतील दुय्यम निबंधक कार्यालयासमोरील मैदान, तसेच तेथीलच पशुवैद्यकीय दवाखान्याचे मोकाळे मैदान याठिकाणी वाहने लावायची आहेत.
 
रहिमतपूर बाजूकडून येणाऱ्या वाहनांनी ठक्कर सिटीच्या पाठीमागील मैदान, तसेच कोडोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात वाहने लावायची आहेत.
 
मेढा बाजूकडून येणाऱ्या वाहनांनी शानभाग विद्यालय मैदान, भूविकास बॅंक मैदान, छत्रपती शाहू महाराज क्रीडा संकुल, कोटेश्‍वर मैदान, कला व वाणिज्य कॉलेज मैदान या ठिकाणी वाहने लावयची आहेत.
 
परळी व कास भागाकडून येणाऱ्या वाहनांनी कोटेश्‍वर मैदान, कला व वाणिज्य कॉलेज मैदान, क्रांती स्मृती विद्यालय मैदान, तालीम संघ मैदान याठिकाणी वाहने लावायची आहेत.
 
मोळाचा ओढा व वाढे फाटा मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी टीसीपी मैदान, सेंटपॉल विद्यालय मैदान, पत्री सरकार स्मारक मैदान, शिवाजी संग्रहालय मैदान, बांधकाम विभागाचे जुने विश्रामगृह या ठिकाणी वाहने लावता येणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: R u coming for Modi's meeting in Satara ? Then read it carefully