सरकारने एक भरून पीक विमा योजना सुरू केली आहे. यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेकतरी पीक विमा योजनेत सहभागी झाले आहेत.
सांगली : रब्बी हंगाम (Rabi Season) सन २०२४-२५ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (PM Crop Insurance Scheme) जिल्ह्यातील १ लाख २ हजार ३१ शेतकऱ्यांनी (Farmers) पीक विमा घेऊन ६१ हजार ९०८ हेक्टरवरील पिकांचे संरक्षण केले आहे. यामध्ये रब्बी ज्वारी (बागायत), रब्बी ज्वारी (जिरायत), गहू (बागायत), हरभरा व उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा घेतला आहे, गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या तुलनेत यंदाच्या रब्बी हंगामात विमा घेणाऱ्यांची संख्या ४९ हजार १३६ ने वाढला आहे.